Bengal Bypoll Results : ममता बॅनर्जी यांची बंगालमध्ये जबरदस्त घौडदौड सुरुच

Bengal Bypoll Results : ममता बॅनर्जी यांची बंगालमध्ये जबरदस्त घौडदौड सुरुच

Published on

Bengal Bypoll Results : पश्चीम बंगालमध्ये ३० सप्टेबरला झालेल्या पोटनिवडणुकीचा (Assembly Bypoll) आज निकाल लागणार आहे. तीन जागांसाठी बंगालमध्ये मतदान झाले होते. यातील बंगालच्या भवानीपूर विधानसभेच्या जागेवर सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी भवानीपूर विधानसभा मतदारसंघातून उमेदवार (Mamata Banerjee Bhabanipur Seat) असल्याने या निवडणुकीकडे पश्चिम बंगालसह देशाचे लक्ष लागून राहिले आहे.

ममता बॅनर्जी यांना २८,८२५ मतांची आघाडी

पश्चिम बंगालच्या तीन जागांसाठी विधानसभा पोटनिवडणुकांचा आज निकाल आहे. निकालाचा कल जवळजवळ स्पष्ट होत आहे. दरम्यान मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी विरोधी भाजपचा सुफडा साफ केला आहे. तिनही जागांवर तृणमुलचे उमेदवार आघाडीवर आहेत. याचबरोरबर भवानीपूर मधून उभ्या असेल्या ममता बॅनर्जी ९ व्या फेरीअखेर ३७५०४ मतांनी आघाडीवर आहेत.

भाजपच्या उमेदवार प्रियांका तिब्रेवाल यांना ८६७९ मते मिळाली आहेत. सीपीएमचे श्रीजीब बिस्वास यांना ८७५ मते मिळाली आहेत. तर ११४ मते NOTA मध्ये गेली आहेत. ममता बॅनर्जी यांनी २८,८२५ मतांची आघाडी घेतली आहे. दरम्यान समसेरगंज आणि जंगीपूर या जागांवरही तृणमुल आघाडीवर आहे.

दरम्यान मागच्या काही महिन्यांपूर्वी झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये नंदीग्रामधून ममता बॅनर्जी यांचा पराभव झाला होता. यामुळे त्या भवानीपूर विधानसभा मतदारसंघातून पोटनिवडणूक लढवत आहेत.

याशिवाय, मुर्शिदाबाद जिल्ह्याच्या समसेरगंज आणि जंगीपूर विधानसभा मतदार संघातील पोटनिवडणुकांचे निकालही जाहीर होणार आहेत.

Bengal Bypoll Results :  ममता बॅनर्जी ५० हजारांनी निवडून येणार

तृणमूल काँग्रेसच्या माहितीनुसार, ममता बॅनर्जी ५० हजारांपेक्षा जास्त मतांच्या फरकाने भवानीपूर जागेवरून विजयी होतील. यावर भाजपचे म्हणणे आहे की, भवानीपूर मतदारसंघात ममता बॅनर्जी यांना आमच्या उमेदवार प्रियंका तिब्रेवाल यांनी चांगली लढत दिली आहे.

तृणमुल काँग्रेस की भाजप? काटे की टक्कर

एप्रिल आणि मे मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीदरम्यान दोन उमेदवारांचा मृत्यू झाल्याने या दोन जागांच्या निवडणुका रद्द कराव्या लागल्या.

या तीन विधानसभा मतदारसंघात एकूण ६९७१६४ मतदार नोंदणीकृत आहेत.

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममत बॅनर्जी यांचा सामना भवानीपूर मतदारसंघात भाजपच्या प्रियांका तिब्रेवाल आणि सीपीआय-एमचे श्रीजीब बिस्वास यांच्याशी आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news