बेळगाव : मराठा लाईट इन्फंट्रीमध्ये भारत-पाक युद्धातील वीर जवानांना अभिवादन

बेळगाव:  1971 मध्ये भारत पाक युद्धात शहीद झालेल्या जवानांना पुष्पचक्र अर्पण करताना ब्रिगेडियर रोहित चौधरी.
बेळगाव: 1971 मध्ये भारत पाक युद्धात शहीद झालेल्या जवानांना पुष्पचक्र अर्पण करताना ब्रिगेडियर रोहित चौधरी.

बेळगाव; पुढारी वृत्तसेवा : मराठा लाईट इन्फंट्रीमध्ये भारत-पाक युद्ध विजय उत्सव साजरा करण्यात आला. मराठा लाईट इन्फंट्रीमध्ये बुधवारी १९७१ मध्ये भारत-पाक युद्ध मध्ये विजय मिळवला होता. या युध्दात उत्कृष्ट कामगिरी बजावलेल्या अधिकाऱ्यांना सन्मानित करण्यात आले.

कार्यक्रमात हवालदार मनोहर राणे यांच्या वीर पत्नी साधना मनोहर राणे, अप्पा साहेब मिसाळ, मोहन दीक्षित यांना जिल्हाधिकारी एम जी हिरेमठ, ब्रिगेडियर रोहित चौधरी, मेजर दिलीप नाईक यांच्या हस्ते गौरवण्यात आले.

युद्धात वीरमरण पत्करलेल्या जवानांना पुष्पचक्र अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. भारत-पाक युद्धात विजय मिळवल्याचे प्रतीक म्हणून विजयी ज्योत तेवत ठेवण्यात आली.

महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध झांज पथकाने च्या तालावर कार्यक्रमाची शोभा वाढवली.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news