बेळगाव : बैलहोंगल येथे भलामोठा फुगा हवेतून आल्याने खळबळ

बेळगाव : बैलहोंगल येथे भलामोठा फुगा हवेतून आल्याने खळबळ
बेळगाव : बैलहोंगल येथे भलामोठा फुगा हवेतून आल्याने खळबळ

बेळगाव : पुढारी वृत्तसेवा – बैलहोंगल तालुक्यातील गद्दीकरवीनकोप्प येथे इलेक्ट्रॉनिक डिव्हाईस असलेला फुगा पडल्याने एकच खळबळ उडाली. जिल्हा पोलिस प्रमुखांनी ही बाब गांभीर्याने घेत घटनास्थळी जाऊन पाहणी केली. तापमान पाहण्यासाठी फुग्याद्वारे सोडलेले हे डिव्हाईस असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर सर्वांचाच जीव भांड्यात पडला.

गुरूवारी सकाळी गद्दीकरवीनकोप्प येथील शेतवडीत पांढर्‍या रंगाचा मोठा फुगा पडल्याचे आढळून आले. काहींनी जवळ जाऊन पाहिले असता त्यामध्ये इलेक्ट्रॉनिक्स वस्तू देखील असल्याचे दिसून आले. त्यामुळे घाबरलेल्या परिसरातील नागरिकांनी व शेतकर्‍यांनी ही माहिती पोलिसांना दिली. बैलहोंगलचे पोलिस घटनास्थळी गेले. जिल्हा पोलिस प्रमुख डॉ. संजीव पाटील यांनीही घटनास्थळी भेट दिली.

तापमान मोजण्याचे यंत्र

पोलिस प्रमुखांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. यावेळी काही तज्ज्ञांना सोबत घेऊन या भल्यामोठ्या फुग्यातील ते इलेक्ट्रॉनिक डिव्हाईस काय आहे, याची माहिती घेतली. प्राथमिक माहितीनुसार उंचीवरील वातावरणातील आर्द्रता, हवेचा दाब तपासण्यासाठी व तापमान मोजण्यासाठी सोडलेले हे डिव्हाईस असल्याचे आढळून आले.

हवेचा दाब, तापमान मोजण्यासाठीचे हे यंत्र उपकरण असून काळजी करण्यासारखे काही नाही. परंतु, हे कोठून व कोणी सोडले, याची माहिती घेण्याचे काम सुरू आहे. – डॉ. संजीव पाटील, जिल्हा पोलिस प्रमुख

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news