MahaBudget2023 : किल्ल्यांच्या संवर्धनासाठी ३०० कोटी रुपयांचा निधी : देवेंद्र फडणवीसांची घोषणा | पुढारी

MahaBudget2023 : किल्ल्यांच्या संवर्धनासाठी ३०० कोटी रुपयांचा निधी : देवेंद्र फडणवीसांची घोषणा

पुढारी ऑनलाईन डेस्क : शिवकालीन किल्ल्यांच्या संवर्धनाकरीता ३०० कोटी रूपयांचा निधी देण्याची घोषणा उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घोषणा केली. किल्ले शिवनेरीवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाच संग्रहालय उभारणार असल्याचेही फडणवीस यांनी यावेळी सांगितले. गेल्यावर्षी जूनअखेरीस सत्तेवर आलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारचा हा पहिलाच अर्थसंकल्प आहे.

राज्याचा सन 2023-24 या वर्षाचा अर्थसंकल्प आज (दि.९) विधिमंडळात सादर करण्यात आला. उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रथमच अर्थसंकल्प मांडला. राज्यात सत्तेत येऊन शिंदे सरकारला जवळपास आठ महिने पूर्ण झाले आहेत. या आठ महिन्यांत शिंदे यांनी निर्णयांचा धडाका लावला. त्यामुळे त्यांच्या या कार्यशैलीचे प्रतिबिंब अर्थसंकल्पात उमटेल, अशी अपेक्षा होती. या पार्श्वभूमीवर निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून अर्थसंकल्पात लोकप्रिय घोषणा करण्यात आल्या आहेत.

 

Back to top button