

बेळगाव : पुढारी वृत्तसेवा; कर्नाटक वायव्य पदवीधर शिक्षक आणि पश्चिम शिक्षक मतदारसंघासाठी आज बुधवारी (दि.१५) सकाळी आठ वाजता येथील ज्योती कॉलेजमध्ये मतमोजणीला सुरूवात झाली आहे. आज रात्री ८ पर्यंत या विधान परिषदेच्या तीन जागेसाठीचे चित्र स्पष्ट होणार आहे.
निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रादेशिक आयुक्त अमलान आदित्य विश्वास आणि शिक्षक मतदार संघाचे निरीक्षक मनिष मुदगल यांच्या उपस्थितीत कॉलेजमधील स्ट्राँग रूमचे सील काढण्यात आले आहेत. सर्व मतपत्रिका एकत्र करून, मतांचे पंचवीस गट्टे बांधण्यात येत आहेत. थोड्या वेळात प्रत्यक्षात मतमोजणीला प्रारंभ होत आहे. वायव्य पदवीधर मतदार संघात ११, शिक्षक मतदार संघात १२ तर पश्चिम शिक्षक मतदार संघात एकूण ७ उमेदवार निवडणूक लढवत आहेत.
पदवीधर मतदारसंघात ११ तर शिक्षक मतदारसंघात १२ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असले तरी, खरी लढत ही भाजप आणि काँग्रेसमध्येच आहे. पदवीधर शिक्षक मतदार संघात भाजपकडून अरुण शहापूर तर काँग्रेसकडून माजी खा. प्रकाश हुक्केरी हे मैदानात आहेत. पदवीधर मतदारसंघात काँग्रेसकडून सुनिल संक तर भाजपकडून हणुमंत निराणी हे निवडणूक लढवत आहेत.
भाजपचे उमेदवार अरुण शहापूर आणि हनुमंत निराणी हे याच मतदार संघाचे विद्यमान आमदार आहेत. भाजपचे आ. अरुण शहापूर या निवडणुकीत हॅटट्रिक साधणार की, काँग्रेसचे माजी खा. प्रकाश हुक्केरी यांची पुन्हा एन्ट्री होणार, हे या निवडणुकीत स्पष्ट होणार आहे.
पश्चिम शिक्षक मतदारसंघात 7 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असून यामध्ये विधान परिषदेचे विद्यमान सभापती बसवराज होरट्टी हे निवडणूक लढवत आहेत. वायव्य पदवीधर मतदारसंघासाठी 60 तर शिक्षक मतदारसंघासाठी 84 व पश्चिम शिक्षक मतदार संघासाठी 86 टक्के मतदान झाले आहे.
ओळखपत्र नसताना मतमोजणी केंद्रात आलेल्या उमेदवार हनुमंत निराणी यांच्या पीएला जिल्हाधिकारी नीतेश पाटील यांनी सकाळी खडसावून बाहेर काढले.
पश्चिम शिक्षक मतदार संघाचा दुसऱ्या प्राधान्य क्रमांकची मतमोजणी फेरी पूर्ण झाली आहे. यामध्ये आलेली अधिकृत मतदानाची आकडेवारी अशी,
वैध मते – 14,360
अवैध मते – 1,223
एकूण मतमोजणी – 15,583
हेही वाचा :