कोगनोळी; पुढारी वृत्तसेवा : हुतात्मादिनानिमित्त आज (दि.१७) महाराष्ट्राचे खासदार धैर्यशील माने बेळगाव येथे अभिवादन करण्यासाठी जाणार असल्याचे समजताच कर्नाटक पोलिसांनी महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर बंदोबस्त तैनात केला. त्यामुळे सकाळी ८ वाजल्यापासूनच दूधगंगा नदीसह टोलनाका परिसराला पोलिस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले होते.
बेळगाव येथे हुतात्मादिनानिमित्त अभिवादन कार्यक्रमासाठी खासदार माने जाणार असल्याची माहिती कर्नाटक प्रशासनाला मिळाली. त्यानंतर त्वरीत कर्नाटक पोलिसांकडून महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर बंदोबस्त वाढवण्यात आला. दूधगंगा नदीवर कडक पहारा ठेवून येणाऱ्या वाहनांची चौकशी करण्यात येत होती. पोलिस अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांचा मोठा बंदोबस्त तैनात केल्याने दूधगंगा नदीसह टोलनाका परिसराला पोलिस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले होते. दरम्यान, खासदार माने यांचा दौरा रद्द झाला आहे.
१७ जानेवारी १९५६ रोजी बेळगावमध्ये सीमालढ्यासाठी आंदोलन करणारे आंदोलक पोलिसांच्या गोळीबारात हुतात्मे झाले. त्यामुळे आजचा दिवस सीमाभागात हुतात्मा दिवस म्हणून साजरा केला जातो.
हेही वाचा :