केरळमध्‍ये सार्वजनिक ठिकाणी मास्‍क सक्‍ती, वाढत्‍या कोरोना रुग्‍णसंख्‍येमुळे राज्‍य सरकारचा निर्णय | पुढारी

केरळमध्‍ये सार्वजनिक ठिकाणी मास्‍क सक्‍ती, वाढत्‍या कोरोना रुग्‍णसंख्‍येमुळे राज्‍य सरकारचा निर्णय

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : देशातील काही राज्‍यांमध्‍ये कोरोना रुग्‍णांची संख्‍या कमी होत असली तरी काही राज्‍यांमध्‍ये रुग्‍णसंख्‍या वाढताना दिसत आहे. त्‍यामुळे राज्‍य सरकार खबरदारीचे उपाय करत आहे. आता राज्‍यातील वाढत्‍या कोरोना रुग्‍णसंख्‍येमुळे केरळ सरकारने सार्वजनिक ठिकाणी मास्‍क सक्‍तीचा निर्णय घेतला आहे. ( Masks mandatory )

वाढत्‍या रुग्‍णसंख्‍येमुळे कोरोना प्रतिबंधासाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्यात आली आहेत. दुकाने, चित्रपटगृहे आणि सार्वजनिक कार्यक्रमाच०या ठिकाणी आयोजकांनी सॅनिटायझर पुरावावे, अशी सूचनाही करण्‍यात आली आहे. तसेच सार्वजनिक ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचे नियमही पाळले जावेत, असे केरळ सरकारने स्‍पष्‍ट केले आहे.

 Masks mandatory : केरळमध्‍ये कोरोना सक्रीय रुग्‍णसंख्‍या सर्वाधिक

देशातील अन्‍य राज्यांच्या तुलनेत केरळमध्ये कोरोनाचे सर्वाधिक सक्रिय रुग्ण आहेत. यानंतर कर्नाटक, महाराष्ट्र आणि ओडिशामध्ये प्रकरणे सक्रिय आहेत. १५ जानेवारी रोजी देशात सक्रिय रुग्णांची संख्या 2,149 होती. त्‍यातील १, ३०३ रुग्‍ण हे केरळमधील आहेत. त्‍यामुळे सरकारने दिलेले आदेश पुढील ३० दिवस राज्‍यातील सर्व भागात लागू राहतील, असे प्रशासनाने स्‍पष्‍ट केले आहेत. दरम्‍यान. दिल्ली, महाराष्ट्र आणि पश्चिम बंगालसह आतापर्यंत 11 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये XBB.1.5 प्रकाराची प्रकरणे आढळून आली आहेत.

हेही वाचा : 

 

Back to top button