बेळगाव : बारा वर्षाच्या मुलीला फरफटत नेत भटक्या कुत्र्यांचा हल्ला

बेळगाव : पुढारी वृत्तसेवा; १५ ऑगस्ट रोजी काकतीमध्ये झेंडावंदन करून घरी येत असताना बारा वर्षाच्या लक्ष्मी रामाप्पा नाईक या लहान मुलीवर दहा ते बारा भटक्या कुत्र्यांनी हल्ला केला. यामुळे लक्ष्मीला गंभीर दूखापत झाली आहे. लक्ष्मीला फरफटत नेत असताना तिथून जाणाऱ्या संजू धोनजी या युवकाने धाडसाने त्या मुलीची कुत्र्यांपासून सुटका केली.
काकतीमध्ये भटक्या कुत्र्यांची संख्या खूपच वाढली आहे. भागातील समाजसेवकांनी व गावकऱ्यांनी पंचायतला भटक्या कुत्र्यांच्या समस्येवरून अनेक निवेदने दिलेली आहेत. परंतु प्रशासनाने या समस्येकडे लक्ष दिलेले नाही. या समस्येकडे गांभीर्याने लक्ष द्यावे कारण यापूर्वी पण अशी दोन-तीन प्रकरण झाली आहेत. भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी ग्रामस्थांनी मागणी केली आहे.
हेही वाचा