

पुढारी ऑनलाईन डेस्क : स्टार प्रवाह वाहिनीवरील मुलगी झाली हो (Mulagi Zali Ho) या मालिकेमुळे अभिनेते किरण माने (Kiran Mane) हे घराघरात पोहचले. मात्र त्यांनी ही मालिका सोडली. अभिनेते किरण माने सोशल मीडियावर नेहमी चर्चेत असतात. ते पुन्हा आपल्या फेसबुक (Kiran Mane Fb Post ) पोस्टमुळे चर्चेत आले आहेत.
स्टार प्रवाहावरील अल्पावधीचं लोकप्रियतेच्या शिखरावर पोहचलेली मालिका म्हणजे 'मुलगी झाली हो' (Mulagi Zali Ho). या मालिकेत ते माऊचे बाबा म्हणजे विलास पाटील यांची भूमिका साकारत होते. या मालिकेमधील बाप-मुलीचं अनोख नातं असणाऱ्या त्यांच्या भूमिकेने प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडली होती. रांगड्या आणि साधा सरळ, मनाचा ठाव घेणारा विलास पाटील प्रेक्षकांचा पसंतीस उतरला होता. पण त्यांना या मालिकेतून बाहेर काढण्यात आल्याने चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला होता. तेव्हा ते चर्चेत आले होते. या पार्श्वभूमीवर त्यांनी आणखी एक फेसबुक पोस्ट लिहली आहे.
.'झी मराठी', तुमचे लै लै लै आभार. सहा महिन्यांपूर्वी माझ्या 'अत्यंत वादग्रस्त ठरवल्या गेलेल्या' विषयाला, तुमच्या प्राईम टाईममध्ये स्थान देऊन, त्यावर योग्य ते मत विचारायचं आनि मांडायचं 'स्वातंत्र्य' सुबोध भावे-अनिता दातेला दिल्याबद्दल !