बेळगाव : कुत्र्याच्या हल्ल्यात ठार झालेल्या बालकाच्या वडिलांना 10 लाखांची भरपाई | पुढारी

बेळगाव : कुत्र्याच्या हल्ल्यात ठार झालेल्या बालकाच्या वडिलांना 10 लाखांची भरपाई

बेळगाव : पुढारी वृत्तसेवा: बाळेकुंद्री येथे कुत्र्याच्या हल्ल्यात मरण पावलेल्या 22 महिन्यांच्या मृत मुलाच्या वडिलांना 10 लाखांची भरपाई देण्यात यावी, असा आदेश उच्च न्यायालयाने बजावला आहे. बेळगाव जिल्हा पंचायतीने ही भरपाई द्यावी, असेही न्यायमूर्ती सूरज गोविंदराज यांनी आदेशात म्हटले आहे.

28 नोव्हेंबर 2018 रोजी बाळेकुंद्री येथील 22 महिन्यांचा अब्बासअली युसूफ सनदी हा घराच्या परसात खेळत होता. त्याच्यावर भटक्या कुत्र्यांनी हल्ला केला. त्यात त्याचा मृत्यू झाला होता. वडील युसूफ यांनी न्यायालयात धाव घेतली होती. त्यावर न्यायमूर्ती सूरज गोविंदराज यांनी उपरोक्त निर्णय दिला. युसूफ यांना जि. पं. ने 10 लाख रुपयांची भरपाई द्यावी. घटना घडलेल्या दिवसापासून त्यावर वार्षिक 6 टक्के व्याज अदा करावे , असेही आदेशात म्हटले आहे.

म्हातारपणीचा आधार

मृत मुलगा वडिलांचा म्हातारपणातील आधार होता. घटनेमुळे त्यांचे मानसिक खच्चीकरण झाले. लहान मुलाचा कुत्र्यांनी हल्ला करून झालेला मृत्यू ही भयानक घटना आहे. यासाठी भरपाई द्यावी. त्याचबरोबर न्यायालयीन प्रक्रियेसाठी खर्च म्हणून 20 हजार रु. द्यावेत. वैद्यकीय खर्चही द्यावा. सरकारने जि. पं. ने भरपाई देण्यासाठी निधीची तरतूद करावे, असेही आदेशात म्हणण्यात आले आहे.

हेही वाचलंत का? 

Back to top button