बोटा : ‘त्या’ मृतदेहाची ओळख पटली | पुढारी

बोटा : ‘त्या’ मृतदेहाची ओळख पटली

बोटा : संगमनेर तालुक्याच्या पठारभागातील वरूडीपठार शिवारात सोमवार (दि.27) रोजी सकाळी 90 वर्षीय स्री जातीचा अनोळखी मृतदेहाची ओळख पटलेली आहे.

अनुसया तुळशीराम काळे असे मयत महिलेचे नाव आहे. वरूडी पठार येथील संजय दगडू फटांगरे यांच्या मळ्यातील शेताजवळ असलेल्या पाण्याच्या चारीत एका अनोळखी स्त्री जातीचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला होता.

घारगाव पोलिसांनी अधिकचा तपासात केला असता सदर महिलेचा मुलगा यशवंत तुळशीराम काळे घटनास्थळावर आले असता सदर मृतदेह त्यांची अनुसया तुळशीराम काळे यांचाच असल्याचे सांगितले. यावरून ‘त्या’ मृतदेहाची ओळख पटली आहे.

Back to top button