बेळगाव : ‘त्या’ 35 विद्यार्थिनी परीक्षेपासून दूरच ; हिजाब परिधान करण्याबाबत विद्यार्थिनी ठाम | पुढारी

बेळगाव : ‘त्या’ 35 विद्यार्थिनी परीक्षेपासून दूरच ; हिजाब परिधान करण्याबाबत विद्यार्थिनी ठाम

बेळगाव : पुढारी वृत्तसेवा
आरएलएस कॉलेजमध्ये मंगळवारी परीक्षा देण्यासाठी आलेल्या विद्यार्थिनींना आल्यापावली परीक्षा न देताच परत जावे लागले. हिजाब उतरवूनच परीक्षा द्यावी, या निर्णयावर कॉलेज ठाम राहिले तर विद्यार्थिनी आम्ही हिजाब घालूनच परीक्षा देणार या निर्णयावर ठाम राहिल्याने मंगळवारीदेखील त्या 35 विद्यार्थिनींना परीक्षा देता आली नाही.

  • बेळगाव : सीईटीची तारीख लवकरच, १५ हजार शिक्षकांची भरती होणार
    आरएलएस कॉलेजमध्ये प्रथम, द्वितीय व तृतीय अशा तिन्ही पदवी व वर्गांमध्ये मिळून 35 मुस्लीम विद्यार्थिनी आहेत. मंगळवारी गडबड होऊ नये म्हणून बंदोबस्तासाठी चन्नमा पोलिस पथक व महिला पोलिस आरएलएसमध्ये दाखल झाल्या. सात महिला पोलिस कॉलेजच्या प्रवेशद्वारवर थांबून होत्या.
  • KLE University : केएलई अभिमत विद्यापीठाला ‘ए प्लस’ श्रेणी
    हिजाब घालून कॉलेजमध्ये प्रवेश द्या, मात्र वर्गात बसताना हिजाब उतरवूनच बसा, असा आदेश जिल्हाधिकार्‍यांनी दिला आहे. त्याचे आम्ही पालन करत आहोत, अशी भूमिका कॉलेज व्यवस्थापकांनी घेतली. मात्र पदवी कॉलेजला हा नियम लागू नाही, त्यामुळे आम्हाला हिजाब घालून परीक्षा देण्यासाठी परवानगी द्यावी, अशी मागणी विद्यार्थिनींनी केली. यातून कोणताच तोडगा निघाला नाही. त्यामुळे मंगळवारी देखील त्या 35 विद्यार्थींनींना परीक्षा देता आली.

हेही वाचलत का ? 

Back to top button