बेळगाव : कोगनोळीत कुत्र्याने रोखली १० मेंढ्यांची चोरी | पुढारी

बेळगाव : कोगनोळीत कुत्र्याने रोखली १० मेंढ्यांची चोरी

कोगनोळी : पुढारी वृत्तसेवा

श्वानामुळे मेंढ्या चोरण्याचा चोरट्यांचा प्रयत्न फसला. त्यामुळे मेंढपाळाचे लाखो रुपयांचे नुकसान टळले आहे. येथील कॅनॉलजवळ रामा धुळप्पा गोरडे (रा. कोगनोळी) यांची बकरी शिवारात बसविण्यात आली होती. अंधाराचा फायदा घेऊन तीन चोरटे 10 मेंढ्या चोरून नेत होते. त्यावेळी राजू कोळी यांच्या श्वानाची मदत झाली. राजू कोळी यांची आई रात्री धार्मिक कार्यक्रम आटोपून घरी आल्यानंतर घरातील श्वान निसटून पळून गेले.

त्यांनी आपल्या मुलाला उठवून श्वानाला पकडण्यासाठी सांगितले. श्वानाचा पाठलाग करताना कॅनॉलजवळ श्वान थांबून भुंकत होते. त्यावेळी राजू कोळी व सहकार्‍यांनी आवाजाच्या दिशेने बॅटरीद्वारे पाहिले असता तिघेजण खांद्यावरून बकरी घेऊन जात असल्याचे निदर्शनास आले. त्यांचा पाठलाग करताच चोरटे बकरी टाकून पळून गेेले. मेंढपाळांना उठवून घटनेची माहिती दिल्यावर मेंढ्यांची चोरी झाल्याचे लक्षात आले. काही मेंढ्या उसाच्या शेतामध्ये पाय बांधून टाकण्यात आल्या होत्या. श्वान आणि नागरिकांची चाहूल लागताच चोरट्यांनी पलायन केले. श्वानामुळे मेंढ्यांचे प्राण वाचल्याने मेंढपाळाने श्वानाचे कौतुक केले.

हेही वाचलंत का?

Back to top button