punjab election : ‘डेरा’तील भक्‍तांना मतदानापूर्वी राम रहीम सांगणार ‘मन की बात’, ६९ मतदारसंघात थेट परिणाम! | पुढारी

punjab election : 'डेरा'तील भक्‍तांना मतदानापूर्वी राम रहीम सांगणार 'मन की बात', ६९ मतदारसंघात थेट परिणाम!

नवी दिल्‍ली ; पुढारी वृत्‍तसेवा 

डेरा सच्चा सौदाचा प्रमुख गुरमीत राम रहीम  याची २१ दिवसांच्या फर्लोवर तुरुंगातून सुटका झाली आहे. ताे सध्या गुडगावमधील सेक्टर ५० मधील डेरा चर्चा घरात उपस्थित आहे. खून आणि बलात्काराच्या गुन्ह्यात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला गुरमीत राम रहीम तुरुंगातून बाहेर येण्याला (punjab election) पंजाब निवडणुकीशीही जोडून पाहिले जात आहे.

गुरमीत राम रहीमला ४८ तासांमध्‍ये अहवाल सादर हाेणार ?

डेराची ४५ सदस्यीय समिती बाबाच्या सतत संपर्कात असून, येत्या ४८ तासांत अहवाल सादर करण्याची शक्यता आहे. त्यानंतर निवडणुकीसंदर्भात गुरमीत राम रहीम आपल्‍या अनुयायांना सूचना देईल. (punjab election) पंजाबमधील मालवा भागात जवळपास 69 जागांवर डेराचा प्रभाव आहे.

पंजाब विधानसभा निवडणुकीला (punjab election) अवघे १० दिवस शिल्लक असल्याने डेऱ्यात हालचाली वाढल्‍या आहेत. लाखो अनुयायी असलेल्या डेरामधील भक्‍तांचे मतदान प्रभावी  ठरते.  मागील निवडणुकीतही डेरा समर्थकांनी शेवटच्या क्षणी भाजपला साथ दिल्याचा अकाली-भाजप युतीला फायदा झाला. त्यावेळी आम आदमी पार्टी असा विचार करत चालली होती की, त्‍यांना मावलात चांगल्‍या जागा मिळतील; पण सरतेशेवटी आम आदमी पक्षाचे गणित चुकले आणि काँग्रेस पंजाबमध्ये सत्तेच्या सिंहासनावर पोहोचली.

सर्वत्र सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे निगराणी… 

बाबा राम रहीम यांना ज्या चर्चागृहात ठेवण्यात आले आहे, तिथे सर्वत्र सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. मुख्य गेटपासून मुख्य रस्त्यापर्यंत सुरक्षा कर्मचारी तैनात आहेत. छताला मोठे पडदे लावून मंडप चारही बाजूंनी झाकण्यात आला आहे. दर तासाला एक  ‘व्हीआयपी’ सेक्टर 50 च्या मंडपात येत आहे. ताफ्याच्या वाहनांच्या खिडक्यांवर काळी फिल्म लावण्यात आली आहे. यावरून बाबांना भेटायला कोण येत असेल याचा अंदाज बांधणे कठीण आहे.

विधानसभा निवडणुकीपूर्वी ‘नाम चर्चा’

डेरा सच्चा सौदाचा प्रमुख गुरु गुरमीत राम रहीम हा 2017 पासून हरियाणाच्या सुनारिया तुरुंगात शिक्षा भोगत आहे. पंजाब विधानसभा निवडणुकीच्या एक महिना आधी डेरा सच्चा सौदाने दोन मोठे मेळावे आयोजित केले होते, ज्यामध्ये लाखो लोक जमले होते. डेरा या मेळाव्याला ‘नाम चर्चा’ असे संबाेधताे.  यंदाच्‍या विधानसभा निवडणुकीत  डेरा सच्चा सौदाचा प्रमुख गुरु गुरमीत राम रहीम याचा अद्‍याप कितपत प्रभाव हे विधानसभा निकालानंतरच स्‍पष्‍ट हाेणार आहे.

हेही वाचलं का? 

 

Back to top button