हिजाब वाद : रॅलीला परवानगी नाकारल्याने संताप | पुढारी

हिजाब वाद : रॅलीला परवानगी नाकारल्याने संताप

जमखंडी : पुढारी वृत्तसेवा

बागलकोट जिल्ह्यातील रबकवी-बनहट्टी तालुक्यातील बनहट्टी येथे हिजाब-भगवा शेला वादाप्रसंगी झालेल्या हल्ल्याचा निषेध व्यक्‍त करण्यासाठी रॅली काढण्यास परवानगी मागण्यासाठी बनहट्टी पोलिस ठाण्यासमोर हिंदू संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली पण परवानगी नाकारण्यात आल्याने संताप व्यक्‍त करण्यात आला.

तम्मण्णप्पा मार्ग, मंगळवार पेठ, सोमवार पेठ, वैभव चित्रपटगृह मार्गे ईश्‍वरलिंग मैदानपर्यंत रॅली काढण्यात येऊन तहसीलदार संजय इंगळे यांना निवेदन सादर करण्यात आले.बनहट्टीत मंगळवारी तणाव निर्माण होण्यास काँग्रेस नेता कारणीभूत असल्याचा आरोप श्रीरामसेना राज्य सचिव महालिंग गुंजगावी यांनी केला. मंगळवारच्या घटनेचा निषेध म्हणून रबकवी-बनहट्टीत बंद पाळण्यात आला असून शिक्षकावर झालेल्या हल्‍ला प्रकरणी सर्व हल्‍लेखोरांना अटक करून कठोर कारवाई करण्याची मागणी केली. शांतता भग्न करण्याच्या प्रकाराचा मठाधीशांनी निषेध करून हिंदू संघटनेच्या मागणीला पाठिंबा दिला. रबकवी-बनहट्टी तहसीलदार संजय इंगळे यांना निवेदन देण्यात आले. यावेळी नंदकुमार गायकवाड, महालिंग गुजगावी, श्रीशैलगौडा पाटील आदी उपस्थित होते.

बनहट्टी बंद यशस्वी

जमखंडी : पुढारी वृत्तसेवा
बनहट्टीत हिजाब विरूद्ध भगवा वाद चिघळल्याने तणाव निर्माण झाला असून हिंदू संघटनेच्या बनहट्टी बंदला संपूर्ण पाठिंबा मिळून स्वयंप्रेरित बंद यशस्वी झाला. दरम्यान 9 रोजी दुपारी 12 पासून ते 11 फेब्रुवारी रोजी सकाळी 6 पर्यंत जमावबंदीचा आदेश जारी करण्यात आला आहे. बनहट्टीत शिक्षकावर झालेल्या हल्‍ला प्रकरणी दोघांना अटक करण्यात येून त्यांची न्यायालयीन कोठडीत करण्यात आली असून अन्य तिघांचा शोध घेऊन त्यांना अटक करण्यात येत असल्याची माहिती बागलकोट जिल्हा पोलिस प्रमुख लोकेश जगलासर यांनी दिली.

हेही वाचलंत का?

Back to top button