बेळगाव : सीबीटी, मध्यवर्ती बसस्थानकाचे काम संथगतीने

बेळगाव ः सीबीटीच्या पहिल्या मजल्याचे घालण्यात आलेले स्लॅब.
बेळगाव ः सीबीटीच्या पहिल्या मजल्याचे घालण्यात आलेले स्लॅब.
Published on
Updated on

बेळगाव : पुढारी वृत्तसेवा
येथील मुख्य बस स्थानकाचे बांधकाम संथगतीने सुरू असून, आतापर्यंत जवळपास 75 टक्के काम झाले. सीबीटीचे काम अद्याप 50 टक्केच पूर्ण झाले आहे. दोन वर्षांत पूर्ण होणारे हे काम चार वर्षे झाली तरी अद्याप अपूर्णच आहे. याचा प्रवाशांबरोबरच बसस्थानक प्रशासनालाही फटका बसला आहे.मुख्य बसस्थानक आणि सीबीटीचे काम फेबु्रवारी 2017 मध्ये सुरू करण्यात आले. सीबीटीचे काम हे स्मार्टसिटी योजनेतून सुरु असून मुख्य बसस्थानकाचे कामाचा नाशिक येथील ठेकेदाराकडून सुरू आहे.

बेळगाव ः सीबीटीच्या पहिल्या मजल्याचे घालण्यात आलेले स्लॅब.
बेळगाव ः सीबीटीच्या पहिल्या मजल्याचे घालण्यात आलेले स्लॅब.

भूमिपूजनानंतर सुरुवातीच्या काळात या दोन्ही बस स्थानकाचे कामकाज गतीने सुरू होते. त्यानंतर कोरोना महामारीमुळे लॉकडाऊनमुळे काम रखडले. मुख्य बसस्थानक आणि सीबीटी हे शहरातील मध्यवर्ती भागात असल्यामुळे वाहतुकीला अडथळा होऊ नये, म्हणून याचे काम अनेकदा रात्रीच्या वेळी करण्यात आले. मुख्य बस्थानकाचे काम आता जवळपास 75 टक्के पूर्ण झाले आहे. ठेकेदाराने याचे काम 31 मार्च 2022 पूर्वी करण्याचे आश्‍वासन दिले आहे. मात्र, अजून किमान सहा महिने तरी काम पूर्ण होण्यासाठी लागणार आहेत. सीबीटी बसस्थानकाच्या दुसर्‍या मजल्याच्या स्लॅबभरणीचे काम सोमवारी करण्यात आले. यासाठी 33 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. काही दिवसांपासून सीबीटीचे काम लांबणीवर पडले होते. सीबीटी बसस्थानकात प्रवाशांच्या सोयीसाठी तळमजल्यामध्ये सुसज्ज पार्किंग व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे दुचाकी आणि चारचाकी वाहने घेऊन येणार्‍या प्रवाशांना पार्किंग उपलब्ध होणार आहे. मध्यवर्ती बसस्थानकाला जोडण्यासाठी भुयारी मार्ग करण्यात येत आहे. त्यामुळे पादचारी आणि प्रवाशांना ये-जा करणे सोयीचे हेणार आहे.

सीबीटी-एक नजर…
सीबीटी एकूण प्रकल्प 33.8 कोटी,काम पूर्ण 50 टक्के, मुख्य बसस्थानक एकूण प्रकल्प 30 कोटी, काम पूर्ण 75 टक्के.

मुख्य बसस्थानकात 38 प्लाटफॉर्म

रेस्टॉरंट, हॉल, चालक, वाहक आणि प्रवाशांसाठी विश्रामगृह, तिकीट बुकिंगसह जवळपास 30 हून अधिक सुविधा देणार्‍या केंद्राची सोय
मुख्य बसस्थानकाचे काम पूर्ण होण्यास किमान सहा महिने लागतील. उत्तर कर्नाटकमधील हे बसस्थानक सर्वोत्तम दर्जाचे होणार आहे. लॉकडाऊनमुळे बसस्थानकाचे काम रखडले होते. आता कामाला गती प्रप्त झाली आहे. बससेवा खंडित न करता बांधकाम सुरु असल्यामुळे काम संथगतीने होत आहे. – प्रकाश कबाडे कार्यकारी अभियंता, बांधकाम आगाार विभाग.

हेही वाचलतं का? 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news