कारदगा : ढोणेवाडीत आत्मा मलिक ध्यानपीठाची पायाभरणी | पुढारी

कारदगा : ढोणेवाडीत आत्मा मलिक ध्यानपीठाची पायाभरणी

कारदगा : पुढारी वृत्तसेवा
ढोणेवाडी यथील संकपाळ मळ्यात नव्याने निर्माण होत असलेल्या आत्मा मालिक ध्यानपीठाचा पायाभरणी युवानेते बसवप्रसाद जोल्ले यांच्या हस्ते करण्यात आला. प्रमुख पाहुणे म्हणून साधनानंद महाराज, प्राणलिंग स्वामी, हालशुगरचे संचालक रामगोंडा पाटील उपस्थित होते.

आत्मा मालिक ध्यानपीठ होण्यासाठी आदगोंडा संकपाळ परिवाराने जंगलीदास माऊली, देवानंद बाबा व सादिक महाराज यांच्या प्रेरणेतून 20 गुंठे जमीन दान दिली आहे. मठ बांधकामासाठी मंत्री शशिकला जोल्ले व खा. आण्णासाहेब जोल्ले यांच्या प्रयत्नातून 20 लाखाचा निधी मंजूर झाला आहे.

आत्मा मलिक ध्यानपीठ
ढोणेवाडी : आत्मा मलिक ध्यानपीठ बांधकाम पायाभरणीप्रसंगी बसवप्रसाद जोल्ले व मान्यवर तर दुसर्‍या छायाचित्रात कलश मिरवणुकीत सहभागी महिला.

सकाळी वाद्यांच्या गजरात कलश मिरवणूक काढण्यात आली. साधननंद महाराज, प्राणलिंग स्वामी व राजू स्वामी यांच्या हस्ते आत्मा मलिक ध्यानपीठ बांधकामासाठी पूजन झाल्यावर बसवप्रसाद जोल्ले यांच्या हस्ते पायाभरणी कामाचा प्रारंभ झाला. विष्णूपंत पवार, ग्रा. पं. अध्यक्ष तुकाराम माळी, आदगोंडा संकपाळ, राजू माळी, एस. के. माळी यांच्या हस्ते श्रीफळ वाढविण्यात आले. बसवप्रसाद जोल्ले यांनी भारतीय संस्कृती जगात आदर्शवत असून मंदिरांच्या जीर्णोद्धारातून त्याचे पावित्र्य जपले जात असल्याचे सांगत मनाच्या एकाग्रतेसाठी ध्यान-धारणेची गरज असल्याचे सांगितले. कार्यक्रमास ग्रा. पं. सदस्य, मान्यवर व भाविक उपस्थित होते.

हेही वाचलतं का?

 

Back to top button