सुनील जगताप
सुनील जगताप दैनिक पुढारीचे पुणे येथील पत्रकार आहेत. क्रीडा, वन विभाग, पर्यटन, सर्व मराठा संघटना, आणि पर्यावरण या क्षेत्रातील वार्तांकन ते करतात. सन 2006 ते पत्रकारितेत आहेत. त्यांनी वृत्तपत्र विद्या शाखेतून पदविका घेतलेली आहे. सन 2008 मध्ये पुण्यात झालेल्या राष्ट्रकुल युथ क्रीडा स्पर्धेचे त्यांनी सखोल वार्तांकन केले. पुण्यातील सर्व आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय, राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धांचे आतापर्यंत वार्तांकन केलेले आहे. आयपीएल बरोबरच आंतरराष्ट्रीय क्रिकेट कसोटी, एकदिवसीय सामना आणि टी 20 सामन्यांचे वार्तांकन केले आहे. क्रीडा खात्यातील भ्रष्टाचार विरोधात त्यांनी सातत्याने लेखन केले आहे. आतापर्यंत त्यांना विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.