Shiv Jayanti 2025: लोकशाहीचा ढाचा शिवाजी महाराजांनी रचला; उदयनराजे भोसले यांचे प्रतिपादन

“शिवजन्मोत्सव स्वराज्यरथ सोहळा” मिरवणुकीच्या उदघाटन प्रसंगी ते बोलत होते.
Shiv Jayanti 2025
लोकशाहीचा ढाचा शिवाजी महाराजांनी रचला; उदयनराजे भोसले यांचे प्रतिपादनPudhari
Published on
Updated on

पुणे: छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व जाती धर्माला बरोबर घेऊन रयतेचे राज्य निर्माण केले. लोकशाहीचा ढाचा शिवाजी महाराजांनी रचला. महाराजांनी ज्या विचाराने रयतेचे राज्य केले तोच विचार आज ही विविध ठिकाणी विविध जाती धर्म एकत्र येऊन शिवजयंती साजरी करताना दिसून येतो. आजच्या या स्वराज्यरथामुळे सरदार आणि मावळ्यांचे पुन्हा एकदा समरण होत असल्याचे छत्रपती उदयनराजे भोसले यांनी यावेळी सांगितले.

शिवजयंती महोत्सव समिती, पुणे तर्फे आयोजित “शिवजन्मोत्सव स्वराज्यरथ सोहळा” मिरवणुकीच्या उदघाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, समितीचे संस्थापक अध्यक्ष अमित गायकवाड, आमदार हेमंत रासने, संजय जगताप, श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने, विधीज्ञ प्रताप परदेशी तसेच सर्व स्वराज्यघराण्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

यावेळी मोहोळ म्हणाले, महाराजांना राज्याभिषेक करताना प्रत्येक पायरीवर प्रत्येक मावळ्यांची आठवण होत होती. सरदार आणि मावळ्यांमुळेच स्वराज्य निर्माण होऊ शकले. त्यांच्या या पराक्रमाचे पुन्हा एकदा यानिमित्ताने स्मरण होत आहे, ही आनंदाची बाब आहे. यावेळी शिवजयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष अमित गायकवाड यांनी ही आपले मनोगत व्यक्त केले.

भारताच्या इतिहासातील शिवकालीन युद्धकला सादर करणाऱ्या ५१ रणरागिनींचे औरंगासुर मर्दिनी भद्रकाली रणरागिनी "महाराणी ताराराणी शौर्य पथक" मर्दिनी युद्धकला सादर केली. तसेच यावेळी नादब्रह्म ट्रस्ट ढोलताशा पथक, ५१ रणशिंग पथक सहभागी झाले होते.

96 स्वराज्यरथांचा सहभाग...

समितीच्या जिजाऊ मॅांसाहेब शहाजी महाराज शिवज्योत ह्या मानाच्या मुख्य स्वराज्यरथाच्या नेतृत्वाखाली सरसेनापती वीर बाजी पासलकर, सरदार कान्होजी नाईक जेधे, सरदार कृष्णाजी नाईक बांदल, सरनौबत सेनापती येसाजी कंक, सुभेदार नरवीर तानाजी मालुसरे, मानाजी पायगुडे, कान्होजी कोंडे, बाबाजी ढमढेरे, पिलाजीराव सणस, हैबतराव शिळीमकर, त्र्यंबकराव नाईक निंवगुणे, सरदार जैताजी नाईक करंजावणे, सरदार चांगोजी कडू, अढळराव बाबाजी डोहर धुमाळ, सुर्याजी काकडे, सरलष्कर सरसेनापती हंबीरराव मोहिते, सरसेनापती संताजी घोरपडे, सरदार गोदाजी जगताप, सरनोबत सिधोजी थोपटे, झुंजारराव मरळ, शितोळे सरकार, गोदाजी भुरूक, सरनोबत नागोजीराव कोकाटे, श्रीमंत माने सरकार घराणे, सरदार हिरोजी इंदलकर, श्रीमंत सरदार राऊतराव ढमाले, श्रीमंत सुभेदार खंडोजी माणकर, श्रीमंत सरदार दयाजीराव मारणे गंभीरराव, सप्तसहस्त्री सरदार नावजी बलकवडे, वीर माता धाराऊ गाडे, समुद्रस्वामी दर्यासारंग सरखेल कान्होजी आंग्रे, सरदार शिवाजी इंगळे, हिंमतबहाद्दर विठोजी चव्हाण, भोई बांधव, श्रीमंत सरदार लखुजीराजे जाधवराव, गरुड घराणे, चंद्रवंशी (भोपतराव) श्रीमंत सरदार लुखजीराव घारे उपस्तिथ होते.

महाशक्तीशाली सरदार संभाजी काटे, सरदार निंबाळकर घराणे, जगदगुरू संतश्रेष्ठ संत तुकाराम महाराज भक्ती शक्ती स्वराज्यरथ, श्रीमंत हरजीराजे महाडीक, महाशक्तीशाली रणमर्द सरदार संभाजी कोंढाळकर, सरनोबत पिलाजी गोळे, सरदार प्रतापराव गुजर, सरदार वाघोजी तुपे, सरदार पिलाजीराव शिर्के, श्रीमंत महाराज छत्रसाल बुंदेला, धारदेवास महाराष्ट्राचे श्रीमंत पवार घराणे, श्रीमंत गायकवाड सरकार, श्रीमंत महाराज महादजी शिंदे सरकार, गुप्तहेर प्रमुख बहिर्जी नाईक, शिवरत्न शिवाजी काशीद जीवाजी महाले, सरदार जीवाजी सुभानजी रणनवरे, सरदार मल्हारजी तुकोजी निगडे, शुरवीर एकोजी शिरोळे, शुरवीर शेलार मामा, राजेश्री सरदार हांडे, सरदार भोईटे, सरदार मांढरे, स्वराज्यनिष्ठ येसाजी कामठे, श्रीमंत हरजीराजे बर्गे, शिवरायांचे शिलेदार डिंबळे, श्रीमंत तापकीर सरदार, वीर सरदार मालोजी भिलारे, पानीपत वीर महादजी माळवदकर, पानीपत वीर महादजी व दादजी हरपळे, प्रतापगड युध्दवीर सहस्त्री सरदार कोडांजी वरखडे, दक्षिण दिग्वीजय वीर मानाजी मोरे, स्वराज्याचे निष्ठावंत सरदार दरेकर , स्वराज्याचे शिलेदार कुंजीर, स्वराज्यनिष्ठ शेळके, वीर फडतरे, राजे साळुंखे चालुक्य राजवंश, स्वराज्यनिष्ठ सरदार बाबर, सिंहगड वीर विठोजी कारके, दुर्ग अजिंक्यतारा वीर किल्लेदार मानाजी साबळे, शुरवीर सावंत स्वराज्यघराणे, सहस्त्री सरदार रामजी पांगारे, स्वामीनिष्ठ खंडो बल्लाळ चिटणीस, सरदार काळे, वीर बाजीप्रभु देशपांडे यांचे स्वराज्यरथ आपआपला गौरवशाली इतिहास मांडत सहभागी झाले.

शिवछत्रपतींच्या पुतळ्यावर हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी...

शिवछत्रपतींच्या पुतळ्यावर सलग १४ व्या वर्षी हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी करुन शिवजयंती महोत्सव समितीचे प्रवर्तक संस्थापक अध्यक्ष अमित गायकवाड मानवंदना दिली. एसएसपीएमएस शाळेतील श्री शिवछत्रपतींच्या पूणार्कृती पुतळ्यावर ईशान अमित गायकवाड यांच्या हस्ते हेलिकॉप्टरमधून सलग १४ व्या वर्षी पुष्पवृष्टी करण्यात आली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news