

पुढारी ऑनलाईन डेस्क : आशिया चषक स्पर्धेत आज श्रीलंका आणि बांगलादेश आमने-सामने असतील. या दोन्ही संघांसाठी हा सामना 'करो या मरो' असा आहे. कारण दोन्ही संघांनी अफगाणिस्तान विरुद्धचा सामना गमावला आहे. ग्रुप-बीमधील अफगाणिस्तान संघाने दोन सामने जिंकत 'सुपर 4' मधील आपले स्थान निश्चित केले आहे. त्यामुळे श्रीलंका विरूद्ध बांगलादेश सामन्यात जो संघ जिंकेल त्याला सुपर 4मध्ये स्थान मिळणार आहे.
आजचा सामना जिंकत दोन गुण मिळण्यासाठी दोन्ही संघ प्रयत्नशील असतील. श्रीलंकेची बांगलादेश विरूद्ध नेहमीच सरस कामगिरी राहिली आहे. आतापर्यंत दोन्ही संघानी १३ सामने खेळले. यातील ११ सामने श्रीलंकेने जिंकले आहेत. आशिया चषक स्पर्धेत दोन्ही संघ तीनवेळा आमने-सामने आले आहेत. यातील दोन सामने बांगलादेशने तर एक सामना श्रीलंकेने जिंकला आहे.
आजचा सामना दुबईमध्ये होणार आहे. याच खेळपट्टीवर भारताचे दोन सामने झाले आहेत. वेगवान गोलंदाजाना या सामन्यात मदत झाली होती. या खेळपट्टीवर पहिल्या काही षटकांमध्ये वेगवान गोलंदाज चांगली मदत होते. या मैदानावर मागील दोन वर्षांमध्ये १६ टी-20 सामने झाले आहेत. यातील धावाचा पाढलाग करणारा (प्रथम गोलंदाजी) संघ १४ वेळा जिंकला आहे. तर दोनच वेळा प्रथम फलंदाजी करणारा संघ जिंकला आहे.
हेही वाचा