

मुंबई; पुढारी ऑनलाईन : आम आदमी पक्षाचे सर्वेसर्वा आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंतसिंग मान यांनी शुक्रवारी सायंकाळी (दि.२४) उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर भेट घेतली. माजी मुख्यमंत्री तथा शिवसेनेचे पक्षप्रमुख (ठाकरे गट) उद्धव ठाकरे हे सध्या भाजप विरोधी पक्षांच्या नेत्यांची मोट बांधण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्याचाच भाग म्हणून आज अरविंद केजरीवाल आणि भगवंतसिंग मान यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. (Arvind Kejriwal Bhagwant Mann Meet Uddhav Thackeray)
मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंतसिंग मान यांनी मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांच्याशी भेट घेऊन विविध मुद्द्यांवर चर्चा केली. या चर्चेनंतर तिघांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. (Arvind Kejriwal Bhagwant Mann Meet Uddhav Thackeray)
माध्यमांशी बोलताना अरविंद केजरीवाल म्हणाले, उद्धव ठाकरे यांचे वडील बाळासाहेब ठाकरे हे वाघ होते. जरी उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे नाव व चिन्हं चोरलं गेलं असलं तरी उद्धव ठाकरे वाघच राहतील. तसेच सर्वोच्च न्यायालयाकडून उद्धव ठाकरे यांना दिलासा मिळेल अशी आशा यावेळी व्यक्त केली.
पुढे बोलताना अरविंद केजरीवाल म्हणाले, आम्ही जनतेचा विचार करतो, येथील समस्यांचा, बेरोजगारीचा, सामन्य जनतेचा विचार करणारे आमचे पक्ष आहेत. या देशात एक असा पक्ष आहे जो नेहमी निवडणुकांचाच विचार करतो असा टोला यावेळी केजरीवाल यांनी भाजपवर केला. तसेच त्यांनी ईडी, सीबीआय सारख्या एजन्सीचा वापर पळपुट्या लोकांकडून केला जातो अशीही टीका केली.
उद्धव ठाकरे यांच्याकडून संभाजी नगर, धाराशिव नामांतरणाचे स्वागत
उद्धव ठाकरे यांनी नामांतरणाच्या विषयावर माध्यमांना प्रतिक्रीया दिली, त्यांनी यावेळी बोलताना औरंगाबादचे नाव संभाजी नगर आणि उस्मानाबादचे नाव धारशीव केल्याबाबत सरकारचे धन्यवाद मानले. त्यांनी राज्यसरकारचे आभार मानले की, मागील सरकारच्या नामांतरणाच्या निर्णयाला रद्द न करता त्याबाबत केंद्राकडून परवानगी मिळवली या बाबत आभार मानत या निर्णयाचे स्वागत केले.
अधिक वाचा :