Arjun-Bhumi : अर्जुनने भूमीला उचलून घेतले, व्हिडिओ पाहताच मलायका…

arjun-bhumi
arjun-bhumi
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : रोमँटिक चित्रपटाच्या शूटिंगसाठी गेलेले अर्जुन कपूर आणि भूमी पेडणेकर स्कॉटलंडमध्ये रोमँटिक झाले आहेत. दंगा मस्तीच्या मूडमधील दोघांचा व्हिडिओ पाहिल्यानंतर मलायकाला काय वाटेल? असे आम्ही म्हणत नाही. (Arjun-Bhumi ) तर नेटिझन्स या दोघांची स्टोरी, व्हिडिओ पाहून म्हणताहेत. द लेडी किलर या चित्रपटासाठी अर्जुन-भूमी स्कॉटलंड येथे गेले होते. दोघेही मोकळ्या वेळेत दंगा-मस्ती करताना दिसताहेत. अर्जुनने त्याच्या इन्स्टा स्टोरीला एक फोटो टाकला आहे. ज्यामध्ये भूमी स्कॉटलंडच्या रस्त्यावर पाठमोरी चालताना दिसतेय. त्याने 'The road less travelled… @bhumipednekar'. अशी कॅप्शन स्टोरीला दिलीय. (Arjun-Bhumi)

भूमीने ही स्टोरी रिपोस्ट केलीय आणि लिहिलंय-'But been travelling too many with you now. From Manali to Glasgow. @arjunkapoor'.

बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूर आणि भूमी पेडणेकर यांनी नुकतेच 'द लेडीकिलर' या थ्रिलर चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले. मात्र, हा चित्रपट अद्याप प्रदर्शित झालेला नाही. पण दोन्ही स्टार्सनी एकमेकांसोबत आणखी एका चित्रपटात काम करायला सुरुवात केली आहे. या जोडीने आणखी एक अनटायटल्ड चित्रपटही साईन केला आहे.

काही दिवसांपूर्वी या नव्या चित्रपटाच्या शूटिंगसाठी अर्जुन आणि भूमीही लंडनला रवाना झाले आहेत. चित्रपटाचे नाव अद्याप निश्चित झालेले नाही. मात्र हा एक रोमँटिक कॉमेडी आणि मनोरंजनाने भरलेला चित्रपट असणार असल्याचे म्हटले जात आहे.

रिपोर्ट्सनुसार या प्रोजेक्टचे दिग्दर्शन मुदस्सर अजीज करणार आहेत. मात्र, या चित्रपटाबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. मुंबई विमानतळावरही अर्जुन स्पॉट झाला होता. चित्रपटाचे शूटिंग मुंबईत आणि कदाचित भारतातील इतर काही शहरांमध्येही होणार आहे.

पूजा एंटरटेन्मेंट या बॅनरखाली वाशू भगनानी निर्मित, भूमी पेडणेकरचा मुदस्सर अझीझसोबतचा पत्नी-पत्नी और वो (२०१९) नंतरचा हा दुसरा चित्रपट असेल. अर्जुन कपूर आणि भूमी पेडणेकर यांच्या 'द लेडीकिलर'चे शूटिंग आधीच पूर्ण झाले आहे. या चित्रपटाची निर्मिती भूषण कुमार, कृष्ण कुमार आणि शैलेश आर सिंग यांनी केली आहे. अजय बहल दिग्दर्शित हा चित्रपट गुलशन कुमार आणि टी-सीरीज यांनी कर्मा मीडिया आणि एंटरटेनमेंट यांच्या संयुक्त विद्यमाने सादर केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news