Andhra Pradesh Shocker : क्रौर्याची परिसीमा… प्रेयसीसाठी त्‍याने गर्भवती पत्नीला दिले ‘HIV’ चे इंजेक्शन!

Andhra Pradesh Shocker
Andhra Pradesh Shocker
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : आंध्रप्रदेशमधील एक धक्कादायक आणि मानवतेला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. येथील मध्‍यमवयीन व्यक्तीने आपल्‍या गर्भवती पत्नीपासून घटस्फोट मिळावा यासाठी तिला इंजेक्‍शन देवून 'एचआयव्ही' बाधित केले. या प्रकरणी पतीवर गुन्हा दाखल झाला आहे. (Andhra Pradesh Shocker)

घटस्‍फोटास पत्‍नीचा विरोध, पतीने रचला कट…

आंध्र प्रदेशमधील गुंटूर येथील  एम. चरन (वय. ४०) याचे विशाखापट्टनममधील एका  २१ वर्षीय तरुणीसोबत अनैतिक संबंध होते. याला  एम. चरन याच्‍या पत्‍नीचा तीव्र विरोध होता. याच कारणावरुन पती-पत्नीमध्ये वारंवार वाद होत होता. प्रेयसीसोबत लग्‍न करण्‍यासाठी एम. चरन पत्‍नीकडे घटस्‍फोटाची मागणी करत होता. मात्र तिचा याला कडाडून विरोध होता. घटस्‍फोटासाठी कारणच नसल्‍याने पतीने एक कट रचला…

Andhra Pradesh Shocker : बोगस डॉक्‍टरची घेतली मदत

एम. चरन याची पत्‍नी गर्भवती होती. घटस्‍फोट मिळविण्‍यासाठी पत्‍नीला एचआयव्ही बाधित करण्‍याचा कट त्‍याने रचला.  एचआयव्‍ही संक्रमित व्‍यक्‍तीसाठी वापरलेल्‍या इंजेक्शन पत्‍नीला देण्‍यासाठी त्याने एका बोगस डॉक्टराची मदत घेतली. पत्‍नी गर्भवती असल्‍याने तिच्‍यावर उपचार सुरु होते. प्रकृती चांगली राहण्यासाठी व मुलगा होण्‍यासाठी  इंजेक्शन देत असल्‍याचे एम. चरन याने आपल्‍या पत्‍नीला  सांगितले. बोगस डाॅक्‍टरने एचआयव्‍ही संक्रमित व्‍यक्‍तीसाठी वापरलेले इंजेक्शन एम. चरनच्‍या पत्‍नीला दिले. काही दिवसांनंतर ती रुग्‍णालयात चेकअपसाठी गेली. यावेळी तिला आपण एचआयव्ही बाधित झाल्‍याची माहिती मिळाली. काही दिवसांपासून ती रुग्णालयात उपचार घेत आहे. आपण  'एचआयव्ही' बाधित कसे झालो? या प्रश्‍नाने ती हैराण झाली होती. तिने केलेल्‍या चौकशीत पती एम.चरनच्‍या यानेच कट रचून आपल्‍याला एचआयव्‍ही बाधित केल्‍याची माहिती मिळाली. यानंतर तिने पतीविरोधात फिर्याद दाखल केली. .

Andhra Pradesh Shocker : मुलगा होत नाही म्हणून त्रास

एम. चरन याच्‍या पत्‍नीने पोलिसांना सांगितले की, लग्नानंतर काही दिवसांमध्‍येच दोघांमध्‍ये वाद होत होता. दाम्‍पत्‍याला दोन मुली आहेत.  दोघांमधील वाद सुरुच राहिला. २०१८ नंतर पतीचे एक युवतीशी अनैतिक संबंध असल्‍याची माहिती पत्‍नीला मिळाली. यानंतर पती चरन हा माहेरहून पैसे आणावेत म्‍हणून पत्‍नीचा शारीरिक व मानसिक छळ करु लागला. तसेच दोन मुलीच झाल्‍याने पतीकडून छळ होत होता, असेही पत्‍नीने तक्रारीत म्‍हटलं आहे.

इंजेक्‍शनद्वारे 'एचआयव्ही'चा धोका कसा असू शकतो ?

मानवी शरीरास जर कोणतेही इंजेक्‍शन टोचले तर रक्‍त येतच असतं. म्‍हणजे ज्‍याला इंजेक्‍शन दिले आहे त्‍याच्‍या सुई आणि सिरिंजचा या रक्‍ताशी संपर्क येतो. एचआयव्‍ही बाधित व्‍यक्‍तीच्‍या शरीरातील रक्‍तात त्‍याचे विषाणू मोठ्या प्रमाणवर असतात. अशा संक्रमित व्‍यक्‍तीसाठी वापरलेल्‍या इंजेक्‍शन पुन्‍हा निरोगी व्‍यक्‍तीला वापरले तर एचआयव्‍ही ससंर्गाचा होण्‍याचा धोका असतो.

हेही वाचा : 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news