BJP leaders : भाजप नेत्यांविरोधात सत्र न्यायालयात याचिका; फुले,आंबेडकरांविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य | पुढारी

BJP leaders : भाजप नेत्यांविरोधात सत्र न्यायालयात याचिका; फुले,आंबेडकरांविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य

मुंबई : पुढारी वृत्तसेवा; भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि समाजसुधारक महात्मा फुले यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य (BJP leaders) केल्याप्रकरणी भाजपाचे उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, तसेच आमदार राम कदमांसह मुंबई पोलीस आयुक्तांविरोधात अॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करा, अशी मागणी करणारी याचिका सत्र न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. भीम आर्मी राष्ट्रीय महासचिव अशोक कांबळे यांनी अॅड. नितीन सातपुते यांच्या मार्फत दाखल केलेल्या याचिकेवर विशेष न्यायाधीश ए. पी. कनाडे यांच्यासमोर २० जानेवारीला सुनावणी होण्याची शक्यता आहे.

९ डिसेंबर रोजी औरंगाबाद येथे एका कार्यक्रमात उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, आंबेडकर आणि फुले यांनी शैक्षणिक संस्था चालवण्यासाठी सरकारी अनुदान मागितले नाही तर त्यांनी शाळा आणि महाविद्यालये सुरू करण्यासाठी निधी गोळा करण्यासाठी लोकांकडे भीक मागितली, असे वादग्रस्त वक्तव्य केले. त्यांच्याविरोधात अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती कायदा आणि भादंवि कलम १५३, १५३ (अ) च्या तरतुदींखाली, १२०ब ५०४ इत्यादी कलामतंर्गत खटला चालविण्याची मागणी याचिकेत करण्यात आली आहे. याचिकेत पाटील यांच्यासह उपमुख्यमंत्री फडणवीस, आमदार राम कदम, मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांच्यासह दोन अन्य पोलीस अधिकाऱ्यांच्या नावाचा समावेश आहे.

Back to top button