Rajasthan Flamingos: राजस्थान अचानक गुलाबी का दिसायला लागलं?

पुढारी वृत्तसेवा

राजस्थान अचानक गुलाबी का दिसायला लागलं?

अलीकडे राजस्थानकडे पाहिलं तर एक वेगळीच छटा दिसतेय. वाळवंटावर जणू गुलाबी रंग पसरल्यासारखं वाटतंय. कारण एकच — फ्लेमिंगो पक्षी पुन्हा भारतात यायला लागले आहेत.

Rajasthan Flamingos | Pudhari

हजारो किलोमीटर उडत येणारे पाहुणे

हे फ्लेमिंगो आपल्याकडचे नाहीत. ते सायबेरिया, युरोप आणि मध्य आशियातून जवळपास पाच हजार किलोमीटर उडत इथे पोहोचतात. थंडी वाढली की ते उबदार प्रदेशाकडे वळतात.

Rajasthan Flamingos | Pudhari

सांभर लेक त्यांना का आवडते?

राजस्थानमधील सांभर लेक ही देशातील सगळ्यात मोठा खारट पाण्याचा तलाव आहे. इथलं उथळ पाणी आणि नैसर्गिक वातावरण फ्लेमिंगोंसाठी चांगलं आहे.

Rajasthan Flamingos | Pudhari

पण 2019 मध्ये चित्र बदललं

2019 मध्ये मात्र सगळं अचानक बिघडलं. हजारोंच्या संख्येने स्थलांतरित पक्षी मृत पडले. नंतर कळलं की हा एक गंभीर आजार होता एव्हियन बोट्युलिझम.Rajasthan Flamingos

Rajasthan Flamingos | Pudhari

हा आजार पसरलाच कसा?

तलावामधून गरजेपेक्षा जास्त मीठ काढलं गेलं. भूजलाचाही मोठ्या प्रमाणावर उपसा झाला. पाणी कमी झालं, कचरा साचला आणि त्यातून आजार पसरायला सुरुवात झाली.

Rajasthan Flamingos | Pudhari

तेव्हा प्रशासन सतर्क झालं

ही गंभीर बाब नॅशनल ग्रीन ट्रिब्युनलपर्यंत पोहोचली. यानंतर तलाव वाचवण्यासाठी कडक नियम लागू करण्यात आले. प्रशासनालाही जाग आली.

Rajasthan Flamingos | Wiki

सांभर लेकला मिळालं संरक्षण

या वर्षी राजस्थान सरकारने सांभर लेकला राष्ट्रीय वेटलँड घोषित केलं. उत्खननावर नियंत्रण आलं आणि तलाव पुन्हा श्वास घ्यायला लागला.

Rajasthan Flamingos | Pudhari

आणि आज चित्र बदलतंय

त्याचे परिणाम आता दिसू लागले आहेत. फ्लेमिंगो पुन्हा येऊ लागले आहेत. राजस्थान हळूहळू पुन्हा गुलाबी होत आहे.

Rajasthan Flamingos | Pudhari
Racket Sports Benefits: रोज रॅकेट हातात घेतलंत, तर मृत्यूचा धोका होतो निम्मा!