Latest

हा तर ट्रेलर, पिक्चर बाकी आहे; फाशीची शिक्षा मिळताच माथेफिरूचा हल्ला

स्वालिया न. शिकलगार

डोंबिवली; पुढारी वृत्तसेवा : फाशीची शिक्षा ठोठावताच आक्रमक झालेल्या खून खटल्यातील माथेफिरूने डायलॉग मारला. हा तर ट्रेलर आहे, पिक्चर अजून बाकी आहे…असा फिल्मी डायलॉग मारत त्याने सरकारी वकिलावर हल्ला चढविला. ही घटना बुधवारी संध्याकाळच्या सुमारास कल्याणच्या न्यायालयात घडली. फाशीची शिक्षा झालेल्या कैद्याला पोलिसांनी आवरले.

आकाश राजू तावडे असे या माथेफिरू कैद्याचे नाव आहे. तो कल्याण-मुरबाड मार्गावरील म्हारळ गावचा रहिवासी आहे. शनिवारी ११ जून, २०१६ रोजी म्हारळ नाक्यावर सर्वांसमक्ष त्याने रमेश केणे नावाच्या रिक्षावाल्याची अत्यंत निर्घृणपणे हत्या केली होती.

आकाश तावडे हा देखील रिक्षा चालवून गुजराण करत होता. नाक्यावर रांगेत रिक्षा लावण्यावरून रमेश आणि आकाश यांच्यात वाद सुरू होता. या वादाचा अंत करण्यासाठी कमरेला खोचलेला धारदार सुरा उपसला. आकाश याने रमेशवर सुरा चालवला. रक्ताच्या थारोळ्यात कोसळून रमेश ठार झाल्याचे समजून आकाशने तेथून पळ काढला.

घाव वर्मी बसल्याने केडीएमसीच्या रुक्मिणीबाई हॉस्पिटलमध्ये मृत्यूशी झुंज देत होता. पण, उपचारादरम्यान, रमेशचा अंत झाला. या प्रकरणी कल्याण तालुका पोलिस ठाण्यात ३०२ अनव्ये गुन्हा दाखल झाला. नंतर पोलिसांनी अत्यंत प्रयत्न करून फरार आकाश तावडेला अटक केली.

तेव्हापासून खुनी आकाश तावडे कल्याणच्या आधारवाडी कारागृहात बंदिस्त आहे. तर दुसरीकडे त्याच्यावर कल्याण जिल्हा व सत्र न्यायालयात खुनाचा खटला सुरू आहे.

या खटल्याची बुधवारी अंतिम सुनावणी जिल्हा व सत्र न्यायालय (तिसरे) यांच्या न्यायालयात सुरू होती. न्यायाधीश न्यायबंदी आकाश तावडे याला उद्देशून म्हणाले, की तुम्हाला या गुन्ह्यात दोषी ठरवून जन्मठेप देण्यात येत आहे. तुमचे काय म्हणणे आहे? असे विचारताच आकाश संतापला.

आरोपीने साक्षीदारांच्या पिंजऱ्यातून बाहेर धाव घेतली…

त्याने साक्षीदारांच्या पिंजऱ्यातून बाहेर धाव घेतली. अतिरिक्त सरकारी अभियोक्ता योगेंद्र पाटील (वय ४२) यांच्यावर हल्ला चढविला. डोक्याच्या उजव्या बाजुच्या कानावर ठोसे लगावले. त्याने फिल्मी डायलॉग मारले. हा तर ट्रेलर आहे, पिक्चर अजून बाकी आहे, तुला खल्लास करेन, मी वाघाचा बच्चा आहे.

अशा धमकी देत त्याने सरकारी अभियोक्ता पाटील यांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळी केली. मात्र आक्रमक माथेफिरूला उपस्थित पोलिसांनी वेळीच आवरल्याने पुढील अनर्थ टळला.

या प्रकरणी अतिरिक्त सरकारी अभियोक्ता योगेंद्र पाटील यांनी फिर्याद दिली. महात्मा फुले चौक पोलिसांनी माथेफिरू आकाश तावडे याच्याविरोधात भादंवि कलम ३५३, ३३२, ५०४, ५०६ अन्वये गुन्हा दाखल केला. पोलिसांकडून त्याची अधिक चौकशी सुरू आहे.

पाहा व्हिडिओ- Manike mage hithe Marathi Version : व्हायरल Manike ला मराठी तडका – apurva naniwadekar

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT