पूजा बिरारी  
Latest

‘स्वाभिमान-शोध अस्तित्वाचा’ : पल्लवी पात्र साकारणारी ही अभिनेत्री आहे तरी कोण?

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन : तुम्हाला साजणा मालिकेतील रमा आठवते का? ही रमा म्हणजेच पूजा बिरारी होय. सध्या पूजा बिरारी 'स्वाभिमान' शोध अस्तित्त्वाचा या मालिकेत दिसतेय. यात ती पल्लवी या मुलीची भूमिका साकारतेय. ऑलमोस्ट सफळ संपूर्ण मालिकेमध्येही तिने अभिनय केला आहे. तुम्हाला तिच्याविषीय या गोष्टी माहिती आहेत का? तर मग चला जाणून घेऊया पूजाविषयी.

अधिक वाचा-

'स्वाभिमान-शोध अस्तित्वाचा' ही मालिका स्टार प्रवाहवर सुरु आहे. नव्या मालिकेत पूजा हिने पल्लवी नावाचे पात्र साकारले आहे. एका छोट्या गावात वाढलेल्या पल्लवीचं शिक्षिका बनण्याचं स्वप्न आहे.

अधिक वाचा-

तर साजणामध्ये ती साधी, सोज्वळ अशी ही रमा आहे. साजणामध्ये ती अभिजित श्वेतचंद्रसोबत दिसली होती. गावातील एका साध्या मुलीची भूमिका तिने साकारली होती. चुडीदार ड्रेस, ओढणी असा पेहराव करणारी पूजा खऱ्या आयुष्यात मात्र बोल्ड आहे.

अधिक वाचा-

अभिनेत्री पूजा बिरारी सोशल मीडियावर सक्रिय असते. आपले फोटो, चित्रीकरणाच्यावेळेसचे फोटो आणि आगामी प्रोजेक्टची माहिती चाहत्यांना ती सोशल मीडियाच्या माध्यमातून देत असते. लवकरच पूजाची नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

अस्तित्वाचा शोध घेऊ पहाणाऱ्या हरहुन्नरी पल्लवीची गोष्ट यातून पाहायला मिळतेय. स्वप्नांचा पाठलाग करत ती तिचं ध्येयं कशा पद्धतीने गाठते याची रंजक गोष्ट यातून उलगडेल.

सोबतच या मालिकेत अभिनेता अक्षर कोठारी, आसावरी जोशी, अशोक शिंदे, सुरेखा कुडची, प्रसाद पंडित यांच्याही भूमिका आहेत. स्वाभिमान मालिकेची निर्मिती फ्रेम्स प्रोडक्शनने केली आहे. कल्पेश कुंभार यांचे दिग्दर्शन आहे.

मिळाला होता कुटुंबाचा पाठिंबा

अभिनय क्षेत्रात करिअरची वाट निवडताना तिला कुटुंबाचा पाठिंबा मिळाला होता. तिने कॉम्प्यूटर सायन्समधून शिक्षण घेतलं आहे. पण, तिला अभिनयाची आवड होती. तिने अभिनय क्षेत्रात करिअर करण्याचं ठरवलं होतं.

तिने जेव्हा तिला अभिनयात करिअर करायचं आहे असं तिच्या आई-वडिलांना सांगितलं. तेव्हा त्यांनी तिला पाठिंबा दिला होता.
पूजा रिअल लाईफमध्येही खूप सुंदर आहे. तिचे हे फोटो तुम्ही मिस करू नका.

हेदेखील वाचा-

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT