Sidharth Shukla : सिद्धार्थ शुक्लाचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आला; मृत्यूचं कारण…

Sidharth Shukla : सिद्धार्थ शुक्लाचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आला; मृत्यूचं कारण…
Published on
Updated on

मुंबई; पुढारी ऑनलाईन: 'बिग बॉस १३' चा विजेता आणि अभिनेता सिद्धार्थ शुक्ला (Sidharth Shukla) यांचे गुरुवारी सकाळी हृदयविकाराच्या झटक्याने मुंबईत निधन झाले. सिद्धार्थ शुक्ला यांच्या मृतदेहावर ५ डॉक्टरांच्या टीमने पोस्टमॉर्टम करून रिपोर्ट पोलिसांना दिला. पंरतु, सिद्धार्थच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या घटनेमुळे अनेक तर्क- वितर्क लावले जात आहेत.

सूत्रांच्या माहितीनुसार, गुरुवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास सिद्धार्थ शुक्लाला अस्वस्थ वाटू लागल्याने त्याच्या आईने त्याला पाणी पिण्यास दिले. परंतु, सकाळी तो उठला नाही. यानंतर आईने मुलींना फोन करून बोलावून घेतले.

यानंतर सिद्धार्थला मुंबईतील कूपर हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. तेथे डॉक्टरांनी सिद्धार्थला मृत घोषित केले. यात दरम्यान आदल्या रात्री त्याने काही औषधांचा डोस घेतल्याची माहिती समोर आली आहे.

५ डॉक्टरांच्या टीमने केले पोस्टमॉर्टम

सिद्धार्थ शुक्लाचे पोस्टमॉर्टम दिवसभर ५ डॉक्टरांच्या टिमने केले. याचा रिपोर्ट डॉक्टरांनी पोलिसांकडे सोपविला. सिद्धार्थच्या मृतदेहाची फॉरेन्सिक तपासणी देखील केली जाणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले आहे. तर सिद्धार्थच्या शरीरावर कोणतीही जखम आढळून आलेली नाही. त्यामुळे मृत्यूचे कारण समजू शकले नाही.

पंरतु, अद्याप पोलिसांनी किंवा डॉक्टरांनी सिद्धार्थचा मृत्यू नेमका कशाने झाला? याचा उलघडा केलेला नाही. याशिवाय सिद्धार्थवर अंतिम संस्कार झाल्यावरच पोलिस याबाबतची माहिती देतील अशा शक्यता वर्तविली जात आहे.

यामुळे सोशल मीडियातून अनेक तर्क-वितर्क लढविले जात आहेत. यात अनेकांनी सिद्धार्थ पूर्णपणे तंदुरुस्त होता आणि दररोज वर्कआउट करत होता, मग अचानक त्याचा मृत्यू कसा काय झाला? यासारखे अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत.

सिद्धार्थ शुक्लाच्या मृतदेहावर अंतिम संस्कार ओशिवरा हिंदू स्मशानभूमीत दुपारी २ वाजता करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. याआधी त्यांचे पार्थिव जुहू येथील ब्रह्मा कुमारी येथे अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात आले होते.

हेही वाचलंत का? 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news