सारा खान 
Latest

सारा अली खानचा टू पीस केशरी कलर बिकीनीत जलवा (photos)

backup backup

पुढारी ऑनलाईन डेस्क : सैफ अली खान आणि अमृता सिंह यांची मुलगी सारा अली खान बॉलिवूडच्या युवा ब्रिगेडमधील सर्वात आशादायक अभिनेत्रींपैकी एक मानली जाते. साराने २०१८ मध्ये केदारनाथमधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. साराने आज इस्टाग्रावर फोटो शेअर केले आहेत.

सारा अली खानने शेअर केलला फोटो काही तासातच व्हायरल झाला आहे. तिने फोटो शेअर करुन त्यासोबत 'तुमचे ओठ जे सांगण्यासाठी घाबरतात ते डोळ्यातून ओरडून सांगितले जाते' जर तुमच्याकडे काही लपवण्यासाठी असेल तर नजर चोरणेच बरे'.अशी कॅप्शन दिली आहे. तिने काही तासांपूर्वी हे फोटो इस्टाग्रावरती शेअर केले आहेत.

काही तासांतच या फोटोला १ लाख २० हजारांवर लाईक्स मिळवले आहेत. अनेकांनी या फोटोला प्रतिक्रिया द्या आहेत.

सारा अली खान हिच्या बर्थडेला सुशीलकुमार शिंदेंचा नातू का चर्चेत?

सैफ अली खान आणि अमृता सिंह यांची मुलगी सारा अली खान बॉलिवूडच्या युवा ब्रिगेडमधील सर्वात आशादायक अभिनेत्रींपैकी एक मानली जाते. साराने २०१८ मध्ये केदारनाथमधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. आजकाल सारा तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे खूप चर्चेत आहे.

सारा ने महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे यांचे नातू वीर पहरियाला डेट केले आहे. २०१८ मध्ये एका मासिकाला दिलेल्या मुलाखतीत सारा अली खान ने या नात्याबद्दल मोकळेपणाने सांगितले. सारा मुलाखतीत म्हणाली होती, "तो (वीर) मी डेट केलेला एकमेव माणूस आहे. त्याच्याशिवाय माझ्या आयुष्यात मला कधीच बॉयफ्रेंड नव्हता."

सारा आणि वीर आता एकत्र नाहीत. पण तिने असेही सांगितले की वीरने तिचे हृदय तोडले नाही. ती म्हणते, "त्याने माझे मन मोडले नाही. माझे हृदय तुटले नाही. सर्व काही ठीक आहे."

जून २०१६ मध्ये सारा अली खान आणि वीर पहारिया यांच्या नात्याची खूप चर्चा झाली. वास्तविक, 'सैराट' या मराठी चित्रपटाच्या प्रदर्शनादरम्यान साराच्या बोटामध्ये एक अंगठी दिसली होती. त्यानंतर तिने वीरशी साखरपुडा केल्याची अटकळ बांधली जात होती.

हे ही वाचलत का :

वेबसिरीज 'जॉबलेस' पाहा प्लॅनेट मराठी' वर ३१ ऑगस्टपासून

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT