मुंबई; पुढारी ऑनलाईन: अभिनेत्री सायली देवधर हिची मुख्य भूमिका असलेली 'वैदेही- शतजन्माचे आपुले नाते' ही मालिका १६ ऑगस्टपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सायली देवधरच्या या मालिकेचा प्रोमो रिलीज झाला आहे.
छोट्या पडद्यावर नवनवीन मालिका प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी नेहमीच सज्ज असते. यात आणखी भर घालण्यासाठी सायली देवधरची नवी मालिका 'वैदेही' येत आहे. या मालिकेत 'देव दिखाव्याला नाही तर श्रद्धेला पावतो' असं सायलीने सांगितले आहे.
या मालिकेत वैदेही ही रामाची भक्त असून तिची देवावर खूपच श्रद्धा असते. वैदेहीच्या चांगल्या स्वभावामुळे ती दुसऱ्यांना नेहमी मदत करत असते. यात तिचा सालस आणि सामंजस्य स्वभाव दाखविण्यात आला आहे. या मालिकेत वैदेही आपल्या कुटुंबासाठी, आपल्या बहिणींसाठी नेहमी खंबीर उभी असून आपल्या कुटुंबाची जबाबदारी योग्यरित्या संभाळत आहे.
या मालिकेत सायली देवधरसोबत अभिनेत्री पल्लवी अजय पाटील आणि तृष्णा चंद्रात्रे सुद्धा दिसणार आहेत. ही मालिका कधी सुरु होणार? याकडे चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
हेही वाचलंत का?