रिंकू राजगुरु म्हणते, जाती विषयी का बोलायचं नाही सर; ‘२०० हल्ला हो’चा ट्रेलर रिलीज | पुढारी

रिंकू राजगुरु म्हणते, जाती विषयी का बोलायचं नाही सर; ‘२०० हल्ला हो’चा ट्रेलर रिलीज

मुंबई; पुढारी ऑनलाईन : रिंकू राजगुरु म्हणते, जाती विषयी का बोलायचं नाही सर. रिंकू राजगुरुच्या नव्या चित्रपटाचा‘२०० हल्ला हो’चा ट्रेलर रिलीज झाला आहे.

अधिक वाचा – 

सैराटच्या प्रचंड यशानंतर रिंकू अनेक मराठी चित्रपटांमध्ये दिसली. तसेच ती वेबसीरीजमध्येही दिसली. ती नागराज मंजुळेच्या झुंड या चित्रपटात अमिताभ बच्चन यांच्यासोबत झळकणार आहे. जगभरात तिचे चाहतेही आहेत.

अधिक वाचा- 

आता रिंकू ‘२०० हल्ला हो’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे.

‘२०० हल्ला हो’ हा चित्रपट दलित स्त्रियांवर झालेल्या अत्याचारावर भाष्य करणारा आहे. एकूण १ मिनिट ५३ सेकंद चित्रपटाचा ट्रेलर प्रभाव टाकणारा आहे. ट्रेलरमध्ये रिंकूने दोनशे महिलांना एकत्र आणले आहे. ती त्यांच्यावर झालेल्या अन्यायाविरुद्ध आवाज उठवते.

नव्या चित्रपटामधील रिंकूचा दमदार अभिनय पाहण्यासाठी तिचे लाखो चाहते उत्सुक आहेत. या ट्रेलरची सध्या सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे.

अधिक वाचा – 

चित्रपटात दिग्गज अभिनेते

दिग्गज अभिनेते अमोल पालेकर, वरुण सोबती आणि रिंकू राजगुरु यांची प्रमुख भूमिका आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन सार्थक दासगुप्ता यांनी केलं आहे.

चित्रपटाचे लेखक-दिग्दर्शक सार्थक दासगुप्ता म्हणाले-हा चित्रपट त्या दलित महिलांच्याविषयी आहे. ज्यांना अत्याचाराला क्रूरपणे सामोरे जावे लागले.

समाजात छेडछाड, त्रास आणि अपमान सहन करावा लागला.

त्या संबंधित व्यक्तीला अद्दल घडवण्यासाठी, शिक्षा देण्यासाठी स्त्रियांनी कायदा आपल्या हातात घेतला.

मला अपेक्षा आहे की, हा चित्रपट त्या अत्याचाराविरोधात नक्की आवाज देईल, सामाजात बदलाची गरज आहे.

हेदेखील वाचा –

 

 

View this post on Instagram

 

A post shared by ZEE5 (@zee5)

Back to top button