sunny leone 
Latest

सनी लिओनी हिची एक झलक पाहण्यासाठी तोबा गर्दी, टॉलिवूडमध्ये जाण्यास सज्ज

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन

बोल्ड स्टार सनी लिओनीने तिच्या सौंदर्याने चाहत्यांच्या मनावर भूरळ घातलीय. आपल्या डान्सने आणि अदाने तिने सर्वांनाच घायाळ केलं आहे. सनीच्या अप्रतिम फॅशन सेन्सची आणि ग्लॅमरस लूकची झलक पाहण्यासाठी चाहते किती उत्सुक आहेत, याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये सनी लिओनीची एक झलक पाहण्यासाठी चाहते खूप आतुर दिसत आहेत. बॉलिवूडनंतर ही अभिनेत्री लवकरच टॉलिवूडमध्ये दिसणार आहे.

व्हिडिओत दिसत आहे की, सनी लिओनीची एक झलक पाहण्यासाठी चाहते उत्साहित दिसत आहेत. बॉलीवूडमध्ये बेबी डॉल, पिंक लिप्स आणि इतर अनेक धमाकेदार गाण्यांद्वारे तिने अक्षरश: डोलायला लावले आहे. तेव्हापासून ती चाहत्यांच्या हृदयावर राज्य करत आहे. सनी तिच्या सौंदर्य, ग्लॅमरस लूक, विनोद आणि वादांमुळे अनेकदा चर्चेत असते. सनीला तिच्या सुंदर दिसण्यासोबतच तिच्या स्टाईलसाठी ओळखले जाते. सोशल मीडियावर ॲक्टिव्ह असलेली बेबी डॉल अर्थातच सनी लिओनीचा व्हिडिओ इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये सनी लिओनीची एक झलक पाहण्यासाठी चाहते आतुर दिसत आहेत.

एमएक्स प्लेयरची सनी लिओनची वेब सीरिज 'अनामिका' हॉलिवूड चित्रपट 'किल बिल'पासून प्रेरित आहे. प्रभासच्या राधे श्यामपासून ते सनीच्या अनामिकापर्यंत या वेब सिरीज आणि चित्रपट मार्चच्या या आठवड्यात प्रदर्शित होत आहेत.

सनी लिओनीचा हा व्हिडिओ तिच्या अधिकृत इन्स्टा हँडलवरून शेअर केला आहे. हा व्हिडिओ तिरुपतीचा आहे जिथे सनी तिच्या आगामी चित्रपटाच्या शूटिंगसाठी गेली होती. सनीला पाहण्यासाठी आणि तिची एक झलक पाहण्यासाठी चाहते खूप उत्सुक असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. सनीला पाहताच चाहते तिच्याकडे धाव घेताना दिसत आहेत. तिथे शिट्ट्या, टाळ्या ऐकू येत आहेत. अंगरक्षक लोकांचा जमाव रोखण्याचा प्रयत्न करत उभे आहेत. सनी चाहत्यांना भेटण्यासाठी बाहेर पडते आणि हात उंचावून सर्वांचे अभिवादन स्वीकारताना दिसते. व्हिडिओमध्ये सनी लिओनीने पांढरा टी-शर्ट आणि डेनिम जीन्स परिदान केल्याचे दिसते.

टॉलिवूडमध्ये जाण्यास सज्ज

ईशान सूर्या दिग्दर्शित विष्णू मंचू आणि पायल राजपूत यांच्या आगामी चित्रपटाद्वारे सनी टॉलिवूडमध्ये दिसणार आहे. सनी लिओनीनेही तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून चाहत्यांना याची माहिती दिली. हा चित्रपट कॉमेडी असल्याचं समोर येतंय. मात्र सनीची भूमिका काय असेल, याबाबत कोणतीही माहिती उपलब्ध नाही. सनी एका शहरी महिलेची भूमिका साकारणार असल्याचे समोर आले आहे. दरम्यान, विष्णू आणि पायल हे मुख्य कलाकार गली नागेश्वर राव आणि स्वाती ग्रामीण भूमिकेत दिसणार आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT