Latest

“शर्जीलवर कारवाईची तुमची हिंमत नाही” : गोपीचंद पडळकर

अनुराधा कोरवी

विटा; पुढारी वृत्तसेवा: महाराष्ट्रातील हिंदूना शिव्या देणारा शर्जील उस्मानीसारख्या व्यक्तीवर तुम्हाला कारवाई करण्याची हिंमत नाही. अशा भेकड प्रवृत्तीनी आम्हाला हिंदूत्व शिकवण्याची आवश्यकता नाही, अशी टीका भाजपचे प्रवक्ते, आमदार गोपीचंद पडळकर यांनी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यावर केली आहे.

आमदार गोपीचंद पडळकर म्हणाले की, उद्धव सेनेचे ५६ आमदार हिंदुत्वासाठी निर्माण झालेल्या युतीच्या जीवावरच निवडून आले आहेत. हे कदाचित संजय राऊत विसरले असतील. त्यांनी ओवीसीची तुलना भाजपाचे अंगवस्त्र म्हणून केले आहे. पण याच ओवीसीला आलिंगन घालून मालेगावच्या सत्तेच्या इदीचा नजराणा तुम्ही पेश केला होता.

एवढंच नाही तर, अमरावती महापालिकेतसुद्धा सत्तेसाठी बाळासाहेबांच्या विचारांना तिलांजली दिली होती. त्यामुळे आता 'जनाब राऊत एमआयएम की मुहब्बत कौन है?' हे महाराष्ट्राला सांगायची आवश्यकता नाही,  असेही पडळकर म्‍हणाले.

योगींनी मुख्यमंत्री बनू नये, शपथा घेणाऱ्यांना योगीजी बघून घेतील. ते सक्षम आहेत. पण महाआघाडीचे मदारी डमरू वाजवतात आणि तुम्ही त्यांना खुश करण्यासाठी कोलांट्या उड्या मारता, हे रोजच मनोरंजन आधी बंद करा, आता महाराष्ट्रातील जनतेला या खेळाची किळस आली आहे, असेही आमदार पडळकर यांनी या वेळी म्हणाले.

हेही वाचलंत का? 

पाहा व्हिडिओ : कर्मवीर भाऊराव पाटील अण्णांनी त्यांच्याच ऐतवडे बुद्रुक गावात उभ्या केलेल्या शाळेला भेट

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT