Pawanar : Murder 
Latest

वर्धा : अल्पवयीन मुलीची गळा आवळून हत्या

मोनिका क्षीरसागर

वर्धा; पुढारी वृत्तसेवा : पाच दिवसांपासून बेपत्ता असलेल्या १४ वर्षीय मुलीची गळा आवळून हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सदर घटना बुधवारी (दि.२०) सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास उघडकीस आली. या घटनेने परिसरात खळबळ निर्माण झाली आहे.

पवनार येथील अल्पवयीन मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार सोमवारी सेवाग्राम पोलिसांत मुलीच्या आईने दिली होती. तक्रारीची दखल घेत सेवाग्राम पोलिसांनी तपास करीत मुलीचा शोध घेतला. दरम्यान, पोलिसांनी सतीश जोगे (वय ३०) रा. पवनार याला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्याने मुलीची हत्या केल्याची माहिती पुढे आली. पोलिसांनी मृतदेह खड्ड्यातून बाहेर काढला आहे. पण मृतदेह कुजलेल्या अवस्थेत सापडला आहे.

यावेळी घटनास्थळी पोलिस अधीक्षक प्रशांत होळकर, अप्पर पोलिस अधीक्षक यशवंत सोळंके, उपविभागीय पोलिस अधिकारी पियुष जगताप, सेवाग्रामचे ठाणेदार निलेश ब्राम्हणे यांच्यासह पोलिस कर्मचारी उपस्थित होते. पुढील तपास पोलिस करत आहेत.

भोंग्यांचे राजकारण I पुढारी | अग्रलेख

हेही वाचलत का ?

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT