कडूस (पुणे) ; पुढारी वृत्तसेवा : वडगाव पाटोळे (ता. खेड जि.पुणे) येथे महिलेला ठार करणारा बिबट्या जेरबंद करण्यात आले आहे. वडगाव पाटोळे (ता. खेड जि.पुणे) मागील तीन महिन्यापासून वडगाव पाटोळे भागात एका बिबट्या दहशत माजवली हाेती. आज (गुरुवार) मध्यरात्री महिलेला ठार करणारा बिबट्या जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले आहे. यामुळे नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे.
वडगाव पाटोळे येथे (ता.३१ ऑगस्ट ) रोजी साबळेवस्ती परिसरात जनाबाई वामन गडदे ही साठ वर्षाय महिला एका बिबट्याच्या हल्यात ठार झाली होती. वनविभागाने तेंव्हा पासून या परिसरात लक्ष ठेवले होते. या भागात बिबट्याचे अस्तित्व असल्याने या परिसरात पिंजरे, कॅमेरे बसविण्यात आले होते.
या बिबट्याने शेळ्या, मेढ्या ठार केल्या होत्या, तर दुचाकी स्वारांवर हल्ला केला होता. या परिसरात चार ते पाच बिबटे असल्याचे नागरिकांकडून सांगण्यात येत आहे. बिबट्याला जेरबंद करण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरु होते. अखेर गुरुवारी मध्यरात्री एका बिबट्याला जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले.
कडूस गावातील धाबरशिवार परिसरात मंगळवारी (दि.७) मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास रस्त्यावर बिबट्या फिरताना दिसून आला हाेता.कडूस- धायबरशिवार रस्त्यावर बिबट्याचे दर्शन झाल्याने कडूस परिसरातील नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली होती.
हेही वाचलं का?