मुंबई; पुढारी वृत्तसेवा : राज कुंद्रा याने पॉर्न फिल्म इंडस्ट्रीमध्ये 8 ते 10 कोटींची गुंतवणूक केली असल्याची माहितीही उघड झाली आहे. राज कुंद्रा आणि ब्रिटनमध्ये वास्तव्याला असलेल्या त्याच्या भावाने केनरिन नावाची कंपनी स्थापन केली आहे. पॉर्न फिल्म चित्रपटांचे व्हिडिओ भारतात शूट केले गेले होते. आणि 'वी ट्रान्स्फर'च्या माध्यमातून ते केनरिन कंपनीला पाठवले गेले होते.
अधिक वाचा :
ही कंपनी राज कुंद्रानेच स्थापन केली असून, त्याची नोंदणी परदेशात केली; जेणेकरून भारताच्या सायबर लॉ पासून स्वतःचा बचाव करता येईल.
राजचा माजी पीए उमेश कामत हा भारतातील केनरिन प्रॉडक्शन कंपनीचा प्रतिनिधी होता. Hotshot> अॅप याच कंपनीचे.
व्हॉट्सअॅप ग्रुपवर डील
राजच्या अटकेनंतर काही व्हॉट्सअॅप चॅट्स समोर आले आहेत. अश्लील चित्रपट बनविण्याच्या धंद्यातून राज कुंद्राने बक्कळ कमाई केल्याचे त्यावरून स्पष्ट होते.
अधिक वाचा :
व्हायरल व्हॉट्सअॅप चॅटवर अकाऊंट्स नावाचा एक ग्रुप दिसतो. राज त्याचा अॅडमिन आहे. या ग्रुपवर राज, त्याचे नातेवाईक आणि पोर्न मूव्ही मेकर कंपनी प्रॉडक्शन हाऊसचे चेअरमन प्रदीप बक्षी यांच्यात पैशांचे व्यवहार आणि कंटेंट पोस्टिंगविषयी चर्चा झाल्याचे दिसते.
पाच जणांच्या या ग्रुपमध्ये प्रदीप आणि राज यांच्यात व्यवसायात कमी- जास्त होणारी कमाई, मार्केटिंगची रणनीती, विक्रीत वाढ, पोर्न अभिनेत्रींना कमाई झाली की नाही, याबद्दल खुली चर्चा झाली.
अधिक वाचा :
अश्लील चित्रपटांच्या व्यवसायात भरपूर नफा व्हायचा आणि त्यामुळे राज खूप खूश होता, हे त्याच्या चॅटवरून लक्षात येते. या ग्रुपवर बिझनेस डील्ससुद्धा राज फायनल करत होता.
हे ही वाचा :