मुंबई; पुढारी ऑनलाईन डेस्क: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविषयी वादग्रस्त विधान केल्याबद्दल केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना मंगळवारी अटक करण्यात आली. राणे यांच्या विधानाविराेधात राज्यभर पडसाद उमटले. ठिकठिकाणी शिवसैनिक रस्त्यावर उतरले, युवा सेनेने मुंबईतील नारायण राणे यांच्या बंगल्यासमोर आंदोलन केले. या युवा सैनिकांचा मातोश्री वर सत्कार केला. यावर आमदार नितेश राणे यांनी टीका केली आहे.
नारायण राणे यांच्या बंगल्यासमोर आंदोलन करणाऱ्या युवा सैनिकांचा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी मातोश्रीवर सत्कार केल्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
या फोटोवर नितेश राणे यांनी ट्विट करुन टीका केली आहे.
पश्चिम बंगाल प्रमाणेच ही राज्य पुरस्कृत हिंसा होती! राज्याचा प्रमुख म्हणून मुख्यमंत्री सुरक्षा सुनिश्चित करत आहेत; पण ते खरंच गुंडांचा सत्कार करत आहेत!
महाराष्ट्रातील परिस्थिती !! या ठगांपासून वाचायच असेल तर एकमेव मार्ग म्हणजे राष्ट्रपती राजवट! अस ट्विटमध्ये आमदार नितेश राणे यांनी म्हटल' आहे.