जळगाव; पुढारी वृत्तसेवा : भुसावळ शहरातील श्रध्दानगरातील रहिवासी सचिन नामदेव भगत याच्या हत्येप्रकरणी हद्दपार आरोपी मुन्ना चौधरी याला अटक करण्यात आली आहे.
सचिन नामदेव भगत या तरूणाचा मृतदेह शुक्रवारी पहाटे आढळून आल्याने खळबळ उडाली होती. यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवून मुन्ना चौधरी याला अटक केली आहे.
अधिक वाचा
मृत सचिनचा गुरुवारी वाढदिवस होता. यामुळे त्याने रात्री मुन्ना चौधरी आणि अजून एक तरूण या मित्रांसोबत पार्टी केली होती. मद्याच्या धुंदीत त्यांच्यात वाद उफाळून आल्याने मुन्ना चौधरी याने फावड्याने वार करून सचिनचा खून केला.
यानंतर एका वाहनातून सचिनचा मृतदेह जामनेर रोडवरील गजानन महाराज मंदिरासमोरील रस्त्यावर आणून फेकला.
आरोपी मुन्ना चौधरीला घेतले ताब्यात
मिळालेल्या माहितीवरुन, आरोपी मुन्ना चौधरी याचा या घटनेत सहभाग असल्याचे पोलिसांना समजले. यानंतर पोलिसांनी संध्याकाळच्या सुमारास भुसावळ शहरातील साकेगाव शिवारातील जय जवान पेट्रोल पंपाच्या पाठीमागे सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. यातील एकजण फरार असल्याने पोलिस त्याचा शोध घेत आहेत.
अधिक वाचा
सपोनि. कृष्णा भोये, गणेश धुमाळ, अनिल मोरे, मंगेश गोंटला, हरिष भोये, पोना. रविंद्र बि-हाडे, दिपक जाधव, रमण सुरळकर, उमाकांत पाटील, पोकॉ. कृष्णा देशमुख, विकास सातदिवे, योगेश माळी, किशोर मोरे, ईश्वर भालेराव, प्रशांत परदेशी, परेश बि-हाडे यांनी सापळा रचून मुन्ना चौधरी अटक केली.
याप्रकरणी सचिनची पत्नी सपना भगत यांच्या फिर्यादीवरून मुन्ना चौधरी, राहुल कल्ले, जितू पावरा यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.
अधिक वाचा
मुन्ना चौधरी हा सध्या हद्दपार अवस्थेत असला तरी शहरात त्याचा वावर असल्याचे यातून सिध्द झाले आहे.
तर खून झालेला सचिन भगतहा देखील २०१६-१७ मध्ये हद्दपार झाला होता. मात्र, गेल्या दोन-तीन वर्षात त्याच्याविरुद्ध कुठलाही गुन्हा दाखल नव्हता. मात्र, मुन्ना चौधरीसोबतची मैत्री त्याच्या प्राणावर बेतली आहे.
हेही वाचलंत का?
पाहा :भात लावणीचं काम चालतं कसं ,चला पाहूया