कोगनोळी ते निपाणीपर्यंत राष्ट्रीय महामार्ग खुला 
Latest

निपाणी जवळ राष्ट्रीय महामार्ग मोकळा पण…

दीपक दि. भांदिगरे

निपाणी; मधूकर पाटील : पुणे-मुंबई राष्ट्रीय महामार्ग येथे सौंदलगा हद्दीत मांगूर फाट्यानजीक आलेले पुराचे पाणी ओसरले आहे.  यामुळे पुणे- मुंबई राष्ट्रीय महामार्ग मोकळा झाला आहे.

मात्र, प्रत्यक्ष महामार्गावर आलेल्या पूरस्थळ रस्त्याची पाहणी एनएचआय (नॅशनल हायवे अॅथॉरिटी ऑफ इंडिया, हुबळी) येथील अधिकार्‍यांकडून झाल्याशिवाय निपाणीकडून कोल्हापूरपर्यंत आंतरराज्य वाहतूक सुरू होणार नाही. अशी माहिती निपाणीचे सीपीआय संगमेश शिवयोगी यांनी दै. 'पुढारी'शी बोलताना दिली.

दरम्यान, आंतरराज्य वाहतूक सुरू करण्यासंदर्भात कोल्हापूरचे जिल्हा पोलीस प्रमुख शैलेश बलकवडे व बेळगाव जिल्हा पोलीस प्रमुख लक्ष्मण निंबर्गी हे दोन्ही अधिकारी एकमेकांच्या संपर्कात आहेत. त्यामुळे पुढील किमान पाच तास तरी आंतरराज्य वाहतूक सुरू होणार नाही, असेही सीपीआय शिवयोगी यांनी सांगितले.

आंतरराज्य वाहतूक बंदच…

पुणे बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर पाणी आल्याने अद्यापीही आंतरराज्य वाहतूक बंद आहे. सोमवारी मध्यरात्रीनंतर महामार्गावर आलेल्या पाणी पातळीत कमालीची घट होऊन पाणी ओसरले आहे. त्यामुळे दोन्ही बाजूचा महामार्ग मोकळा झाला आहे.

शिवाय महामार्गावर पुराच्या पाण्यात पडलेला मालवाहू ट्रकही प्रशासनाने बाजूला काढला आहे. दुपारनंतर पूर्ण क्षमतेने महामार्गावरून आंतरराज्य वाहतूक सुरू होईल, अशी शक्यता आहे.

तोपर्यंत आंतरराज्य वाहतुकीला परवानगी…

मात्र तत्पूर्वी रस्त्याची एनएचएआयच्या अधिकाऱ्यांकडून पाहणी केली जाणार आहे.  तोपर्यंत आंतरराज्य वाहतुकीला परवानगी दिली जाणार नाही. मात्र, कोगनोळी ते निपाणी या टापूत महामार्ग मोकळा असल्याने या विभागातील वाहनांना मुभा दिली जाणार आहे.

महामार्गाच्या पश्चिमेकडील बाजूस महापूर आलेल्या जागेवर मोठ्या प्रमाणात कचरा साचला आहे. या परिसराची स्वच्छता सध्या सुरू आहे.

महामार्गावर कोगनोळी जवळ अद्यापही अर्धा ते एक फूट पाणी आहे. याशिवाय महामार्गावर सांगली फाटा ते तावडे हॉटेल या टापूत दोन फूट वाहते. पाणी महामार्गावर आहे. त्यामुळे सर्व परिस्थितीचा अंदाज घेऊनच पूर्ण क्षमतेने वाहतूक सुरू होईल, असेही सीपीआय शिवयोगी यांनी सांगितले.

कोल्हापूर, बेळगाव जिल्हा प्रशासन एकमेकांच्या संपर्कात…

सध्यस्थितीत निपाणी जवळ महामार्ग मोकळा झाला आहे. असे असले तरी महामार्गावर कागल व तावडे हॉटेल परिसरात काही प्रमाणात पाणी आहे. रविवारी कोल्हापूर जिल्हा प्रशासनाकडून पूर आलेल्या महामार्गावरील रस्त्याची जेसीबीच्या साह्याने पाहणी झाली आहे. त्यामुळे कोल्हापूर जिल्हा प्रशासनाच्या सर्व त्या शक्यतेवरच कर्नाटकातून महाराष्ट्रात होणाऱ्या वाहतुकीचे सूत्र अवलंबून आहे. यासाठी कोल्हापूर बेळगाव जिल्हा प्रशासन एकमेकांच्या संपर्कात आहे.

संगमेश शिवयोगी, सीपीआय, निपाणी

दरम्यान, कागल जवळ दूधगंगा नदीचे पाणी महामार्गावर आले होते. येथील पाणी पूर्ण ओसरले असून केवळ मोटरसायकल जाऊ दिल्या जात आहेत.

हे ही वाचा : कोल्हापूर शहर महापुराच्या विळख्यात : Flooded Kolhapur City, Drone Video

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT