मुंबई : पुढारी ऑनलाईन : बॉलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी भारत सोडून जाण्याच्या तयारीत आहे. नवाजुद्दीन सिद्दीकी आणि पत्नि आलिया यांच्यामध्ये मागच्या काही काळात वाद सुरू असल्याचे बोलले जात होते. दरम्यानच्या काळात या दोघांमध्ये सामंजस्य होत पुन्हा एकत्र राहत असल्याच्याही चर्चा आहे. पत्नी आलियाने नुकतीच एक मुलाखत दिली. यामध्ये कुटुंबासह दुबईला जात असल्याची कबुली दिली.
नवाजुद्दीनच्या कुटुंबीयांनी भारत सोडून दुबईमध्ये स्थायिक होण्याचा निर्णय घेतला आहे. याचे कारणही आलियाने एका मुलाखतीमध्ये सांगितले आहे.
या मुलाखतीमध्ये तिने लवकरच दुबईमध्ये शिफ्ट होत असल्याचे सांगितले आहे. 'हो हे खरे आहे की आम्ही दुबईमध्ये शिफ्ट होत आहोत.
दुबईमध्ये गेल्यावर आमची दोन्ही मुले शोरा व यानी तिकडेच शिक्षण घेणार आहेत' असे आलिया म्हणाली.
मुलांच्या शिक्षणासाठी आम्ही हा निर्णय घेत असल्याचेही आलिया म्हणाली
सध्या भारतात ऑनलाईन शिक्षण प्रणाली सुरू आहे. कोरोनामुळे भारतीय शिक्षण प्रणालीमध्ये बदल झाल्याने पुढील काही काळ अशीच ऑनलाईन शिक्षण प्रणाली राहणार असल्याने आम्ही हा निर्णय घेत आहोत. त्यामुळे आम्ही मुलांना दुबईमधील शाळेत प्रवेश केला आहे.
ऑनलाइन शिक्षण घेताना मुले लक्ष केंद्रीत करु शकत नाहीत. शाळेत जाऊन घेतलेले शिक्षण हे फार वेगळे असते. आम्ही लवकरात लवकर दुबई जाण्याचा प्रयत्न करत असल्याचे आलियाने सांगितले.
पत्नि आलिया आणि दोन मुलांसोबत दुबईत स्थायिक झाल्यावर नवाजुद्दीन लंडनला रवाना होणार आहे. त्याचा पुढील चित्रपट 'हिरोपंती २'च्या शूटिंगसाठी तो रवाना होणार आहे.
या चित्रपटात टायगर श्रॉफ आणि तारा सुतारिया मुख्य भूमिकेतआहेत.
सध्या नवाज आणि त्याची पत्नी दोन्ही मुलांसमवेत कसारा येथील नवाजच्या फार्महाऊसवर आहेत.
काही महिन्यांपूर्वी संजय दत्त देखील आपल्या संपूर्ण कुटुंबासह दुबईला शिफ्ट झाला आहे. तो आता थेट दुबईतूनच सोशल मीडियावर आपले फोटो शेअर करत असतो.
हे ही पाहा :