रत्नागिरी; पुढारी वृत्तसेवा : कोकण अतिवृष्टी : जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टी बाधित कुटुंबांना कपडे आणि जीवनावश्यक वस्तूंसाठी प्रती कुटुंब दहा हजाराची मदत देण्यात येणार आहे.
कोकणातील मुंबईसह सहा जिल्ह्यांतील 41 हजार 815 कुटुंबासाठी सुमारे 40 कोटीचे अर्थसहाय्य देण्यात येणार आहे. जुलै महिन्यात कोकणात झालेल्या अतीवृष्टीत अनेक कुटुंबे बाधित झाली.
या आपत्तीत अनेक कुटंबांचे संसार भिजले तर अनेकांचे कपडे तसेच जीवनावश्यक वस्ती वाहून गेल्या. रत्नागिरी जिल्ह्यात चिपळूण तालुक्यात सर्वाधिक पूरहानी झाली. दापोली, संगमेश्वर, राजापूर आदी तालुक्यातही कुटुंबासहीत व्यापार्यांचेही नुकसान झाले.
या आपत्तीत नुकसान झालेल्या कुटुंबांना भांड्यासाठी, कपड्यांकरीता प्रतीकुटुंब १० हजारांची म्हणजेच प्रत्येकी पाच हजार रुपये अर्थसहाय्य मंजूर करण्यात आले आहे.
अतिवृष्टीनंतर करण्यात आलेल्या पंचनाम्यानंतर कोकणातील बाधित ४१ हजार ८१५ कुटुंबांना या अर्थसहाय्यात मदत करण्यात येणार आहे. त्यानुसार प्रशासनाकडे निधी मंजुर करण्यात आला असून हा निधी थेट बाधितांच्या बँक खात्यात संकलित करण्यात येणार आहे.
हे ही वाचलं का?