केआरके 
Latest

‘केआरके’ वर फिटनेस मॉडलचा बलात्काराचा आरोप, गुन्हा दाखल

स्वालिया न. शिकलगार

मुंबई ; पुढारी ऑनलाईन : 'केआरके' वर फिटनेस मॉडलने बलात्काराचा आरोप केला आहे. 'केआरके' म्हणजेच चित्रपट क्रिटिक कमाल राशिद खानवर या प्रकरणी मुंबईमध्ये 'केआरके' विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अधिक वाचा –

एका फिटनेस मॉडलने बलात्काराचा आरोप केल्याने कमाल राशिद खान पुन्‍हा एकदा वादात अडकला आहे.

अधिक वाचा – 

कमाल राशिद खानवर  गंभीर आरोप करणारी मॉडेल एक प्रसिध्द फिटनेस मॉडल आहे. तिने केलेल्‍या तक्रारीनुसार मुंबईतील वर्सोवा पोलिस ठाण्‍यात गुन्‍हा दाखल झाला आहे. परंतु, अद्याप, कमाल राशिद खानकडून कुठलीही प्रतिक्रिया आलेली नाही.

अधिक वाचा – 

बलात्‍काराचा आराेप करणारी फिटनेस मॉडल काही वर्षांपासून फिटनेससंबंधी सोशल मीडियावर पोस्ट करते.

अनेक प्रकरणात वादात 

कमाल राशिद खान सध्या दुबईत कुंटुंबासोबत आहे. सलमान खानचा चित्रपट 'राधे'च्या रिव्ह्यूवरून तो चर्चेत आला होता. चुकीचे परीक्षण प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यासाठी सलमान खानने केआरकेविराेधात तक्रार दाखल केली होती. कमाल राशिद खान सलमानशिवाय विद्या बालन, मीका सिंह यासाख्या सेलिब्रिटींशी पंगा घेतला आहे. कमाल राशिद खानने रणबीर कपूर आणि अलिया भट्टविषयीदेखील वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यांचा घटस्फोट होईल, असेही त्याने म्हटले होते.

रणबीर कपूर आणि आलिया भट्ट बॉलिवूडचे हॉट कपलपैकी एक आहेत. दोघांच्या लग्नावरून मागील काही महिन्यांपासून चर्चा सुरू आहे. नंतर केआरकेने ट्विट करून सांगितले होते की, रणबीर कपूर आणि आलिया भट्ट केव्हा लग्न करणार आहेत. यामुळे केआरके ट्रोलर्सच्या निशाण्यावर आला होता.

अधिक वाचा – 

पाहा व्हिडिओ –  पूरग्रस्तांना बोटींमार्फत जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा | Flood Rescue Operation

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT