नवी दिल्ली; पुढारी ऑनलाईन : सिने अभिनेत्री काजोलने नुकताच आपला ४७ वा वाढदिवस साजरा केला. दरम्यान काजोल या वाढदिवसानिमित्त चांगलीच चर्चेत आली. काजोलचे देशभरात सोशल मीडियावर प्रचंड चाहते आहेत. शेजारी राहणाऱ्या काही चाहत्यांनी तिच्या घरी जात तिचा वाढदिवस साजरा केला.
दरम्यान, काजोल केक कापतानाचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
या व्हिडीओमुळे काजोल सोशल मीडियात प्रचंड ट्रोल होत आहे.
काजोलच्या वाढदिवसाला मीडियातील काही व्यक्ती आणि चाहते केक घेऊन तिच्या घरी भेटण्यासाठी आले होते.
यावेळी काजोलने घराबाहेर येत केक कापला, पण केक कापताना काजोल अत्यंत परक्यासारखी वागणूक देत असल्याचे या व्हिडीओतून स्पष्ट दिसत होते.
काजोलची अशी वागणूक काही लोकांना आवडली नसल्याने ती सोशल मीडियावर ट्रोल होत आहे.
वीरल भयानीने त्याच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे.
यामध्ये काजोल लांब पांढऱ्या रंगाच्या गाऊनमध्ये ती बाहेर येत चाहत्यांना पहिल्यांदा नमस्कार करते आणि लांब हाताने केक कापत चाहत्यांपासून दूर जाण्याचा प्रयत्न करते.
काजोलच्या बॉडी लँग्वेजमुळे तिला केक कापण्यात कोणताही रस नसल्याचे स्पष्ट दिसून येते.
काजोलचा हा व्हिडिओ समोर आल्यानंतर चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली.
यावेळी एक चाहता म्हणाला ज्या लोकांना तुमची काळजी किंवा तुमच्याबद्दल आदर नाही त्यांच्यासाठी तुम्ही पैसा वेळ आणि मेहनत का वाया घालवचा?
यावर दुसरा एक चाहता म्हणाला तुम्ही तिच्या घरी गेला आहे पण तिच्या चेहऱ्यावर कोणताही खुशीचा लवलेश दिसत नाही.
तिला चाहत्यांची काळजी नसेल तर काय उपयोग.
चाहत्यांनी तिच्या या वागण्यावर मोठी नाराजी व्यक्त केली आहे.
या व्हायरल झालेल्या व्हिडिओवर अनेक नाराजीच्या कमेंट्स पाहायला मिळत आहेत.
हे ही पाहा :