कन्नड ; पुढारी वृत्तसेवा : मुंबई-आग्रा महामार्गावरील भांबळे फाट्याजवळ सोनगीरकडून नरडाणाकडे जाणाऱ्या कारचा भीषण अपघात झाला. या अपघातात कन्नड येथील तीन तरुण ठार झाले. सदर तरुण कन्नड होऊन उज्जैन येथील महाकाल दर्शनासाठी (दि.२०) रात्री दहाच्या सुमारास दर्शनासाठी निघाले होते. (दि.२१) रोजी एक ते दोनच्या सुमारास हा अपघात झाला.
कन्नड अपघात अधिक माहिती अशी की, बाभळे फाट्याजवळ जल शुद्धीकरण केंद्रासमोर सोनगीरकडून नरडाणाकडे जाणाऱ्या (MH. 22. U. 7128) क्रमांकाची कार पलटली. कार चालकाचा ताबा सुटल्याने ही कार पलटून तीनशे मीटर अंतरापर्यंत पलटी होत गेली. अपघातात सचिन सुभाष राठोड (वय २७), गणेश भगवानराव अहिरे (वय २६), पवन विजय जाधव (वय २१) सर्व राहणार कन्नड हे तरुण ठार झाले.
सागर समाधान पाटील (वय २३), गौरव कांबळे (वय ३१), किशोर राठोड (२९), नवनाथ अण्णा बोरसे (वय ३०), शिवाजी जग्गू जाधव (२६), सर्व राहणार कन्नड हे जखमी झाले आहेत. या तरुणांना पुढील उपचारासाठी धुळे येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
श्रावण मास असल्याने उज्जैन येथील भोले महाकाल दर्शनासाठी हे तरूण जात होते. तसेच गणेश अहिरे या तरुणाने आपल्या मोबाईलच्या स्टेटसवर अब जलद ही दीदार होगा, तेरा लाल कल उज्जैन की दरबार में होगा असे स्टेटस ठेवून खरंच त्याचे स्टेटस मे तो देवाच्या दरबारात गेला आहे.
यामुळे या आघाताने शहरात शोकाकुळ पसरली आहे जिथे नाही तिथे या तरुणांना श्रद्धांजली वाहण्यात येत आहेत. अपघाताच्या ठिकाणी वाहतूक विभागाचे पोलिस निरीक्षक हेमंत कुमार भामरे यांनी घटनास्थळी भेट दिली.
यावेळी पोलिस उपनिरीक्षक गजानन गोटे, एस .आर गांगुर्डे, विजय पाटील, व्ही. जे. बर्डे आदी पोलीस कर्मचारी याप्रसंगी उपस्थित होते. शिंदखेडा पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे. या अपघातामुळे कन्नड शहरात शोककळा पसरली आहे.