पुढारी ऑनलाईन डेस्क : तस पाहायच झालं तर WhatsApp कडे यूझर्सना आकर्षित करण्यासाठी अनेक फिचर्स आहेत. मात्र आज आम्ही तुम्हाला अशा एका खास फिचरची माहिती देणार आहोत, ज्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल. ज्यांना एखाद्या व्यक्तीचा खासगी मॅसेज जर लपवायचा असेल तर हे आता शक्य आहे. व्हाटस्ॲप आता तुमच्या चॅटला आर्काईव्ह करून परमनंट लपवण्याची परवानगी देते. जरी या चॅटवर नवीन मॅसेज असला तरी. म्हणजेच व्हॉट्सॲप मध्ये चॅट Archived केल्यानंतर नव्या मॅसेजशी संबंधित जोडलेला कोणतेही नोटिफिकेशन पॉप-अप होणार नाही.
या आधी फिचरमध्ये अशा प्रकारची सुविधा नव्हती. या आधी जसा अर्काइव्ह चॅटमध्ये कोणताही नवा मॅसेज आल्यानंतर तो अनआर्काइव्ह होत असे. या फिचरला यूज करण्याआधी वापरकत्यांनी हे पाहिल पाहिजे की, त्यांच्याकडे व्हाट्सॲपचे लेटेस्ट व्हर्जन असेल. चला तर मग पाहुयात कशा प्रकारे हे व्हाट्सॲपचे फिचर वापरू शकता.
या फिचरचा वापर करण्यासाठी चॅट टॅबवर जा. त्या चॅटला टॅप करून ठेवा जो मॅसेज आपल्याला लपवायचा आहे किंवा अर्काइव्ह करायचा आहे. त्याला होल्ड केल्यानंतर तुम्लाला आर्काईव्ह आयकॉन मिळेल. I Phone उपयोगकर्ता चॅटला डावीकडे स्लाईड करू शकता आणि तिथेच अर्काइव्ह ऑप्शन शोधू शकता.
आपल्या Android फोनवर चॅट टॅबमध्ये सर्वात वर जा. आर्काईव्ह आयकॉनवर टॅप करा. आता तुम्हाला आर्काईव्हच्या पुढे एक नंबरही मिळेल. जे तुम्हाला दाखवेल की, आर्काईव्ड केलेला व्यक्तीगत किंवा ग्रुप चॅटमध्ये किती अनरिड मॅसेजेस आहेत.