IPL : दिल्‍ली कॅपिटल्‍सच्‍या ‘गब्‍बर’च्‍या नावावर आणखी एक विक्रम | पुढारी

IPL : दिल्‍ली कॅपिटल्‍सच्‍या 'गब्‍बर'च्‍या नावावर आणखी एक विक्रम

पुढारी ऑनलाईन डेस्‍क
:

आयपीएल २०२१ च्‍या (IPL ) अंतिम साखळी सामन्‍यात दिल्‍ली कॅपिटल्‍सच्‍या सलामीवीर शिखर धवन याने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरोधात दमदार खेळी केली. या खेळीमुळे शिखरच्‍या नावावर आणखी एका विक्रमाची नोंद झाली आहे. त्‍याचबरोबर तो ऑरेंज कॅपच्‍या रेसमध्‍येही कायम राहिला आहे. ऑरेंज कॅपच्‍या रेसमध्‍ये तो आता तिसर्‍या स्‍थानावर आहे.

शुक्रवारी बंगळुरुविरोधातील सामन्‍यात शिखरचे अर्धशतक हुकले. त्‍याने ३५ चेंडूत ४३ धावा केल्‍या. आयपीएल २०२१ (IPL ) हा साखळी सामन्‍यातील अंतिम सामना होता. या खेळीमुळे शिखरने आपल्‍या नावावर आयपीएलमध्‍ये आणखी एक विक्रम नोंदवला आहे. त्‍याने पृथ्‍वी शॉबरोबर ८८ धावांची भागीदारी करत चांगली सलामी दिली. त्‍याने २ षटकार आणि ३ चौकार लगावात ४३ धावा केल्‍या.

(IPL) दाेन हजार धावा पूर्ण करणारा दिल्‍ली कॅपिटल्‍सचा चाैथा खेळाडू

आयपीएल २०२१ (IPL : )शिखरने दिल्‍ली कॅपिटल्‍सकडून खेळताना दोन हजार धावा पूर्ण केल्‍या आहेत. अशी कामगिरी करणारा तो दिल्‍ली कॅपिटल्‍सचा चौथा खेळाडू ठरला आहे. २०१९मध्‍ये शिखरने सनराइजर्स हैदराबाद संघातून दिल्‍ली कॅपिटल्‍समध्‍ये सहभागी झाला होता. शिखर धवनने आजपर्यंत आयपीएलमध्‍ये १९० सामने खेळत ५ हजार ७४१ धावा केल्‍या आहेत.

Hyderabad vs Mumbai : मुंबईचा विजय मात्र प्ले ऑफपासून कोसो दूर!

आयपीएलमध्‍ये सर्वाधिक धावा करणार्‍याचा विक्रम सध्‍या विराट कोहलीच्‍या नावावर आहे. त्‍याने आतापर्यंत ६ हजार २४० धावा केल्‍या आहेत. तर दुसर्‍या स्‍थानावर शिखर धवन आहे. आयपीएल २०२१ ( IPL ) चा विचार करता शिखर धवन याने १४ सामने खेळत ५४४ धावा केल्‍या आहेत. तर ऑरेंज कॅपच्‍या स्‍पर्धेत सध्‍या केएल राहुल याने १३ सामने खेळत ६२६ धावा करत पहिल्‍या स्‍थानावर आहे. तर फाफ डुप्‍लेसिस याने १४ सामने खेळत ५४६ धावा करत दुसर्‍या स्‍थानावर आहे.

शिखरची आयपीएलमधील मागील पाच वर्षांमधील कामगिरी

२०१७ : ४७९
२०१८ : ४९७
२०१९ : ५२१
२०२० : ६१८
२०२१ : ५४४ (आतापर्यंत )

आयपीएल २०२१ सर्वाधिक धावा

केएल राहुल ६२६
फाफ डु प्‍लेसिस ५४६
शिखर धवन ५४४

हेही वाचलं का?

Back to top button