Latest

वर्धा : पोलिस ठाण्यातील ‘सुंदरी’ पट्ट्याने युवकाला मारहाण : निलंबित पाेलिसासह तिघांना अटक

अनुराधा कोरवी

वर्धा, पुढारी वृत्तसेवा: जिल्ह्याच्या आष्टी येथे चक्क पोलिस ठाण्यात एका युवकाला कथित सामाजिक कार्यकर्त्याने पोलिसांच्या सुंदरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पट्ट्याने मारहाण केली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. यानंतर युवकाच्या वडिलाच्या तक्रारीवरून आष्टी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. या प्रकरणात विनायक घावट या पोलिस कर्मचाऱ्यालाही सहआरोपी करून निलंबनाची कारवाई करण्‍यात आली. तसेच निलंबित पोलीस कर्मचारी घावट, कथित सामाजिक कार्यकर्ता राजेश ठाकरे आणि आणखी एकास अटक करण्‍यात आली आहे.

आष्टी पोलिस ठाण्यात एका कथित सामाजिक कार्यकर्त्याने युवकाला पोलिसांच्या सुंदरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मारहाण केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने एकच खळबळ उडाली. यांनतर वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी या बाबतची गंभीर दखल घेत आष्टी पोलिस ठाणे गाठले. याच दरम्यान युवकाच्या वडिलांनी सामाजिक कार्यकर्त्यानी मारहाण केल्याबाबत तक्रार पोलिसात दाखल केली.

तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करत अंतोरा येथील सामाजिक कार्यकर्ता राजेश ठाकरे याला अटक केली. त्याला सहकार्य केल्याप्रकरणी विनायक घावट या पोलिस कर्मचाऱ्यास सहआरोपी करून निलंबनाची कारवाई करण्यात आली. दरम्यान, मारहाण झालेल्या युवक मुंबईला गेला असल्याने त्याचा व्हिडिओ कॉलींगवरून त्याच्या कुटुंबियांशी संपर्क साधला. अंतोरा येथील राजेश ठाकरे आणि युवकातील वादातून ही घटना घडल्याचे परिसरात बोलले जात आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलिस अधीक्षक प्रशांत होळकर, अप्पर पोलिस अधीक्षक यशवंत सोळंके, उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील साळुंखे यांनी आष्टी पोलिस ठाणे गाठले होते. दरम्यान या घटनेमुळे परिसरात खळबळ निर्माण झाली आहे. हा व्हिडिओ गजानन आंबेकर याने तयार केल्याची माहिती पुढे आल्यानंतर त्याच्यावर देखील गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली. या घटनेत आरोपीची संख्या तीन झाली आहे.

हेही वाचलं का? 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT