Virgin Tree  
Latest

Virgin Tree : प्रेयसी मिळवून देणारे झाड!

दिनेश चोरगे

नवी दिल्ली : आजकाल प्रत्येकाला गर्लफ्रेंड असते; पण जर तुम्हाला नसेल तर निराश कशाला होता? तुमच्या निराशेवर येथे नक्की मार्ग मिळू शकेल. फक्त त्यासाठी दिल्लीवारी करावी लागेल. दिल्लीतील एक (Virgin Tree)चमत्कारी झाड तुमची जीवनसाथी मिळण्याची इच्छा पूर्ण करू शकते. याला अंधविश्वास म्हणा अथवा आणखी काही; पण दिल्ली विद्यापीठाच्या हिंदू कॉलेजमधील एक झाड यासाठी प्रसिद्ध आहे.  या झाडाची पूजा मनोभावे केली, तर पूजा करणार्‍याची इच्छा झाड पूर्ण करते, असे मानले जाते.

या झाडाला लव्हर्स पॉईंट असे नाव असून, व्हर्जिन ट्री म्हणूनही ओळखले जाते. दरवर्षी 14 फेब्रुवारीला या झाडावर (Virgin Tree) बॉलीवूड अभिनेत्रीचा फोटो दमदमी माता म्हणून लावला जातो. लाल रंगाचे हार्ट शेपचे पाण्याने भरलेले फुगे लावून झाड सजवले जाते. असे म्हणतात की, दमदमी माईची पूजा करून प्रसाद घेतला की, गर्लफ्रेंड मिळतेच.

गेल्यावर्षी दीपिका पदुकोण दमदमी माता होती, तर त्याआधीच्या वर्षी हा मान (?) कॅटरिना कैफला मिळाला होता. कॉलेज प्रशासनाने हे झाड (Virgin Tree) तोडण्याचा निर्णय घेतला होता. त्यासाठी नवीन कार्यालय या जागेवर बांधायचे असल्याचे कारण दिले होते. मात्र, त्याविरोधात होस्टेल व कॉलेजमधील विद्यार्थ्यांनी जोरदार निदर्शने केली. अखेर झाडाच्या काही फांद्या कापण्यावर तडजोड झाली. झाड पूजेत फक्त मुलेच नाही, तर मुलीही आघाडीवर असतात. चांगला बॉयफ्रेंड मिळावा म्हणून त्या दमदमी मातेला साकडे घालतात.

हेही वाचा : 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT