helmet and Pagadi : शंभर वर्षांनंतर लष्करात पेटला पगडी-हेल्मेट वाद | पुढारी

helmet and Pagadi : शंभर वर्षांनंतर लष्करात पेटला पगडी-हेल्मेट वाद

नवी दिल्ली; वृत्तसंस्था : केंद्रीय संरक्षण मंत्रालयाने सैन्यदलांतील शीख जवानांसाठी 12,730 ‘बॅलेस्टिक हेल्मेट’ खरेदीचा निर्णय घेतला. एमकेयू कंपनीने हे हेल्मेट खास शीख सैनिकांसाठी तयार केले आहे. दुसरीकडे शिखांची धार्मिक संघटना शिरोमणी गुरुद्वारा व्यवस्थापन समितीने या हेल्मेटला आपला तीव्र विरोध दर्शविला आहे. लष्करात 100 वर्षांनंतर पुन्हा एकदा पगडी विरुद्ध हेल्मेट वादाला (helmet and Pagadi) त्यामुळे तोंड फुटले आहे.

शिखांची धार्मिक श्रद्धा लक्षात घेऊनच हे हेल्मेट आम्ही बनवले आहे. शीख जवाना त्यांच्या पगडीवर ते सहजपणे घालू शकतात, असे हे हेल्मेट तयार करणार्‍या एमकेयू कंपनीने स्पष्ट केले आहे. हेल्मेटमध्ये कनेक्टर सिस्टीम बसविले आहे. जवानांचे लोकेशन त्यामुळे सहज कळेल. कॅमेरा, टॉर्चही त्यात आहे. दुसरीकडे, पगडी हाच शिखांचा मुकूट आहे. हेल्मेटच्या माध्यमातून शिखांची स्वतंत्र ओळख संपविण्याचा प्रयत्न सहन केला जाणार नाही, अशी प्रतिक्रिया गुरुद्वारा समितीने दिली आहे.(helmet and Pagadi)

अन्य देशांत नियम काय?(turban-helmet controversy)

कॅनडा : युद्धस्थितीत शीख सैनिकांनी पगडीवर हेल्मेट घालावे.
ब्रिटन : युद्धस्थितीत हेल्मेट घालावे, पण सक्ती करता येणार नाही.
ऑस्ट्रेलिया : दाढी, पगडी ठेवा, पण मोहिमांत हेल्मेट घालावे लागेल.

हेल्मेटला शंभर वर्षांपूर्वीचा पहिला नकार

  • ऑक्टोबर 1914 मध्ये, ब्रिटिशांच्या बाजूने जर्मनीविरुद्ध लढताना शीख पलटणीने हेल्मेट घालण्यास पहिल्यांदा नकार दिला होता. नकार देण्याची ही पहिलीच वेळ होती.
  • पंजाबच्या शीख सभेची तत्कालीन मध्यवर्ती संघटना चीफ खालसा दिवाननेही हेल्मेट घाला, अशी शिफारस केली होती, तरी शीख सैनिक पगडीवरच युद्ध लढले.
  • दुसर्‍या महायुद्धातही (1939-1945) शीख सैनिक पगडी घालूनच लढले. ब्रिटनच्या राणीने ब्रिटनमध्ये दुचाकीस्वार शिखांना हेल्मेट घालण्यापासून सूट दिली.

शीख जवानांसाठी हेल्मेट म्हणजे आमच्या अस्मितेवर हल्ला आहे. केंद्र आणि लष्कराने हा निर्णय त्वरित मागे घ्यावा.
– ग्यानी हरप्रीत सिंग, जत्थेदार, अकाल तख्त

Back to top button