vijay deorkonda 
Latest

coffee with karan : विजय देवरकोंडा सेक्स लाईफविषयी बोलला, कारमध्येच….

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : चित्रपट निर्माता करण जोहरचा सर्वाधिक चर्चेत असलेला चॅट शो कॉफी विथ करण सीझन – ७ (coffee with karan ) सुरू झाल्यापासून तो चर्चेत आहे. कारण आहे करण जोहरसमोर बसलेले स्टार्स आणि त्यांची गुपिते. या आठवड्यात करणच्या शोमध्ये विजय देवरकोंडा आणि अनन्या पांडे दिसणार आहेत. आगामी एपिसोडचा प्रोमो शेअर करण्यात आला आहे, ज्यामध्ये अनन्या पांडे आणि विजय देवरकोंडा हे त्यांचे रहस्य स्वतः उघड करताना दिसत आहेत. करणच्या शोमध्ये विजय देवरकोंडा यांनी त्याच्या वैयक्तिक जीवनाशी संबंधित काही रहस्ये उघड केली. जे ऐकून भल्याभल्यांची बोलती बंद होईल. (coffee with karan )

कॉफी विथ करण सीझन-७ या सर्वात वादग्रस्त शोमधून विजय देवरकोंडा पदार्पण करत आहे. पदार्पण होताच विजय देवरकोंडा एकामागून एक धक्कादायक खुलासे करणार आहे. शेअर केलेल्या कॉफी विथ करणच्या प्रोमोमध्ये तुम्हाला दिसेल की करण जोहर विजयला विचारतो की तू शेवटचे सेक्स कधी केले होते? हा प्रश्न ऐकून विजय देवरकोंडा दचकतो. यानंतर तो लाजतो आणि एक स्माईल देतो आणि म्हणतो – एबोर्ट, एबोर्ट.

यानंतर करण जोहरने सार्वजनिक ठिकाणी सेक्स करण्याबाबत प्रश्न केला. यावर विजय देवरकोंडा असा खुलासा करतात, ज्याबद्दल क्वचितच कोणाला माहिती असेल. करण जोहरचे हे बोलणे ऐकून विजय देवरकोंडा म्हणतो – कारमध्ये केले. विजयचे हे उत्तर ऐकून करण जोहर आणि अनन्या पांडेला धक्का बसला आणि सगळेजण थोडा वेळ सायलेंट मोडमध्ये गेले.

करण जोहरचे तिखट प्रश्न इथेच थांबत नाहीत. त्यानंतर करण विजय देवरकोंडाला विचारतो की, त्याने कधी थ्रीसम केले आहे का? यासाठी विजय देवराकोंडा नकार देतो. पण यातही एक ट्विस्ट आहे. नंतर, करण त्याला विचारतो की त्याला थ्रीसम करायला आवडेल का, ज्यावर विजय देवरकोंडा उत्तर देतो की, थ्रीसम करायला काहीच हरकत नाही.

कॉफी विथ करण सीझन ७ चा हा नवीन प्रोमो पाहिल्यानंतर हे सिद्ध झाले आहे की हा एपिसोड खूप मजेदार असणार आहे. केवळ विजय देवरकोंडाच नाही तर अनन्या पांडेही तिच्या नात्याबद्दल काहीतरी खुलासा करू शकते. कारण प्रोमोमध्ये करण जोहरने अनन्या आदित्य रॉय कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये असल्याचे संकेत दिले आहेत.

दरम्यान, एक डायलॉग म्हणण्यासाठी विजयला खूप मेहनत करावी लागली होती. त्याचा एक व्हिडिओदेखील व्हायरल झाला आहे. विजय देवरकोंडाचा चित्रपट 'लायगर' येत आहे. हा व्हिडिओ विजय देवरकोंडाने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे.

व्हिडिओमध्ये 'आय लव्ह यू' म्हणताना दिसत आहे. व्हिडिओ शेअर करताना त्याने लिहिलंय, 'हे शब्द बोलणं त्याच्यासाठी खूप कठीण होतं.' त्याचसोबत 'आय लव्ह यू लायगर' असं लिहिलं आहे, जे सोशल मीडियावर ट्रेंड करत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT